तीन मुलांची आई 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत गेली पळून, वडील म्हणाले, "घरी नेहमी यायची..."
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये एका तीन मुलांच्या आईने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला सोबत घेऊन पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध

तीन मुलांच्या आईचा धक्कादायक कारनामा

उत्तर प्रदेशातील चक्रावून टाकणारी घटना
Crime News: उत्तर प्रदेशातील हाथरसमधून सर्वांनाच चकित करुन टाकणारी बातमी समोर आली आहे. येथे एका तीन मुलांच्या आईने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्याला सोबत घेऊन पळून गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित मुलाच्या वडिलांनी आरोपी महिला त्यांच्या ओळखीची असल्याचं सांगितलं. संबंधित महिला नेहमी पीडित मुलाच्या घरी येत जात होती. मात्र ती 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत असं कृत्य करेल, याची कोणालाच कल्पना नव्हती. मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार करत आपला मुलगा परत पाहिजे असल्याची मागणी केली आहे.
14 वर्षांच्या मुलासोबत जवळीक
ही घटना चदपा क्षेत्रातील अल्हेपुर चुरसैन गावातील असल्याचं सांगण्यात येत आहे. तक्रारदार राजेंद्र यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी अलीगढच्या जलाली गावातील जयपाल यांच्या घरात आपल्या लहान मुलीचं लग्न लावून दिलं होतं. जयपाल आणि त्यांची पत्नी पूनम यांना 3 मुलं होती. दोन्ही कुटुंबामध्ये चांगले नातेसंबंध असल्याकारणाने पूनमचं राजेंद्र यांच्या घरी सतत येणं जाणं असायचं. यादरम्यान, राजेंद्र यांच्या लहान मुलासोबत पूनमची ओळख वाढत गेली. त्यांच्यातील नात्याचं पुढे प्रेमात रुपांतर झालं. कालांतराने त्यांच्यातील प्रेम फुलत गेलं आणि त्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा: प्रेमात आकंठ बुडालेली महिला बॉयफ्रेंडसोबत पळाली, 4 पोरांना घरीच सोडलं! नवऱ्याची सटकली अन् नंतर घडलं..
प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळून गेली
पूनमने आपल्या अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्याच्यासोबत पळून गेल्याचा आरोप मुलाच्या वडिलांनी केला आहे. राजेंद्र यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिकारी प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे. मीडियाला प्रकरणासंदर्भात माहिती सांगताना राजेंद्र म्हणाले की, "माझ्या लहान मुलीच्या नणंदेने माझ्या अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याला घेऊन पळून गेली. आम्ही त्या दोघांचा खूप तपास केला परंतु, काहीच हाती लागलं नाही."
हे ही वाचा: बाबो... नेहा पेंडसेचा बुम्बाट लूक, यालाच तर म्हणतात हॉट अदा; फोटो पाहून तुम्ही तर...
पोलिसांचा तपास
राजेंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी ते बाजारात गेले होते. त्यावेळी ते घरी परतल्यानंतर सुनेने तिचा अल्पवयीन दिर बेपत्ता असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी आपल्या लहान मुलाचा शोध घेण्यास सुरूवात केली. बराच काळ शोध घेऊनही तो सापडला नाही. अखेर त्यांनी पोलिसांकडे याबद्दल तक्रार केली आणि मुलाला लवकरात लवकर शोधण्याची विनंती केली. पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा लवकरच शोधण्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.