बायकोला खुश ठेवण्यासाठी काय करायचं? प्रेमानंद महाराजांचं सविस्तर उत्तर, 'या' चार गोष्टी कराच
Premanand Maharaj : महाराजांनी अधोरेखित केलेलं सर्वात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे एकनिष्ठता. ते स्पष्टपणे सांगतात की, कितीही सुखसोयी दिल्या किंवा कितीही प्रेम दाखवलं, तरी पतीचे अन्य स्त्रीशी संबंध असतील तर पत्नीला कधीच शांतता मिळत नाही.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बायकोला खुश ठेवण्यासाठी काय करायचं?
प्रेमानंद महाराजांचं सविस्तर उत्तर, 'या' चार गोष्टी कराच
Premanand Maharaj : आजच्या वेगवान आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत पती-पत्नीच्या नात्यात प्रेम, शांतता आणि आपुलकी जपणे अनेक दाम्पत्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. ‘पत्नीला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी नेमकं काय करावं?’ हा प्रश्न अनेक पुरुष विचारत असतात. या प्रश्नाचं उत्तर प्रसिद्ध आध्यात्मिक विचारवंत प्रेमानंद महाराज यांनी अतिशय साध्या, पण प्रभावी शब्दांत दिलं आहे.
प्रेमानंद महाराज म्हणतात की, “मी गृहस्थाश्रमात नाही, त्यामुळे पती-पत्नीच्या व्यवहारातील अनुभव माझ्याकडे नाही. पण शास्त्र आणि अध्यात्म या दोन्हींच्या आधारावर वैवाहिक जीवनात आनंद टिकवणारे काही नियम मात्र स्पष्ट सांगता येतात.” त्यांनी सांगितलेली ही तत्त्वे कोणत्याही वैवाहिक नात्याला मजबूत आणि शांततेने परिपूर्ण करणारी ठरतात.
1) पत्नीच्या इच्छांचा आदर – सुखी नात्याचं पहिलं तत्त्व
महाराजांच्या मते, पत्नीला आनंदी ठेवण्याचा सर्वात मूलभूत नियम म्हणजे तिच्या इच्छांना आणि भावनांना महत्त्व देणे. पत्नीच्या छोट्या-मोठ्या अपेक्षा पूर्ण केल्या, तिचं मत ऐकलं आणि तिच्या मनाविरुद्ध कोणतंही वागणं टाळलं, तर नातं सहज गोड होतं. पत्नीच्या इच्छा पूर्ण करणे म्हणजे फक्त कर्तव्य नव्हे, तर तिच्याप्रती दाखवलेला आदर आणि प्रेम आहे. जेव्हा पती तिच्या भावनांना स्थान देतो, तेव्हा पत्नीच्या मनात विश्वास वाढतो आणि नात्यात सहज सौहार्द निर्माण होतं.










