Govt Job: 'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मोठ्या पदांसाठी भरती अन्... कधीपर्यंत कराल अप्लाय?
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) कडून बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवाइजर (BC Supervisor)पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी!
मोठ्या पदांसाठी निघाली भरती अन्...
भरतीसाठी कधीपर्यंत कराल अप्लाय?
Central Bank of India Recruitment: सरकारी बँकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI)कडून बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवाइजर (BC Supervisor)पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार centralbank.bank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 20 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझरची भरती
'सेंट्रल बँक ऑफ इंडिया'च्या कृषी, ग्रामीण विकास आणि वित्तीय समावेशन विभाग, तसेच केंद्रीय कार्यालयासाठी बिझनेस करस्पॉन्डंट सुपरवायझरची भरती केली जाणार आहे. या भरतीमध्ये निवृत्त आणि तरुण उमेदवार सुद्ध सहभागी होऊ शकतात.
पात्रता आणि वयोमर्यादा
सेंट्रल बँकेच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे. यासोबतच, उमेदवारांना कंप्यूटरचं देखील ज्ञान असणं गरजेचं आहे. यामध्ये एम.एससी (आईटी)/ बी.ई (आईटी)/ एमसीए/ एमबीए क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. या भरतीमध्ये 21 ते 45 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
हे ही वाचा: लव्ह ट्रँगलमधून प्रियकराची निर्घृण हत्या! चाकू आणि सर्जिकल ब्लेडने वार अन्... नेमकं प्रकरण काय?
किती मिळेल पगार?
| सुपरवायझर टाइप | निश्चित पगार | व्हेरिएबल (परिवर्तनशील) कंपोनंट | वाहतूक भत्ता | मोबाईल/इंटरनेट शुल्क |
|---|---|---|---|---|
| कॅटेगरी अ (A) | 15,000 रुपये | 10,000 रुपये | 4,000 रुपये | 500 रुपये |
| कॅटेगरी ब (B) | 12,000 रुपये | 8,000 रुपये | 3,000 रुपये |
500 रुपये हे वाचलं का? |










