प्रेमात आकंठ बुडालेली महिला बॉयफ्रेंडसोबत पळाली, 4 पोरांना घरीच सोडलं! नवऱ्याची सटकली अन् नंतर घडलं..
Shocking love Story Viral News : उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली. येथील एक 40 वर्षांची महिला तिच्या 24 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

40 वर्षांची महिला 24 वर्षांच्या तरुणासोबत झाली फरार

चार पोरांना घरी सोडलं अन् नंतर प्रियकरासोबत पळाली

पतीला समजल्यानंतर काय घडलं?
Shocking love Story Viral News : उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली. येथील एक 40 वर्षांची महिला तिच्या 24 वर्षांच्या प्रियकरासोबत पळून गेली. तरुणासोबत जीवन जगण्यासाठी या महिलेनं तिचं घर सोडण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. महिलेला चार मुलं असून तिच्या लग्नाला 18 वर्ष पूर्ण झाली आहेत.
पत्नी प्रियकरासोबत फरार झाल्यानंतर पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महिलेचं म्हणणं आहे की, तिला आता परत यायचं नाही. तिने विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. महिलेनं माध्यमांशी बोलताना म्हटलं की, नाही..मला आता तिथे राहायचं नाही. मी जिथे आले आहे, तिथेच राहायचं आहे. मला आता कुणाचीच आठवण येत नाही.
महिलेचा नातेवाईक आहे तिचा प्रियकर
महिला आणि तिचा प्रियकर दोघेही ऐकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघांमध्ये मागील चार वर्षांपासून जवळीक वाढली होती. महिलेनं म्हटलंय की, त्यांचं कोर्ट मॅरेजही झालं आहे. पतीला आता कोणतीही अडचण नाहीय. त्याने स्वत:च म्हटलंय की, खुशीने जात असेल, तर बिंधास्त जा.
हे ही वाचा >> Mithi River: मुंबईकरांनो, तुमच्या मिठी नदीचं मरण उघड्या डोळ्यांनी पाहा! मुंबई Tak ची 'ही' डॉक्यूमेंट्री तुम्हाला टाकेल हादरवून!
28 वर्षांचं लग्न, चार मुलं
महिलेच्या पतीनं म्हटलं की, लग्नाला 28 वर्ष झाले आहेत. तिला चार मुलं आहेत. यामध्ये सर्वात मोठी मुलगी 18 वर्षांची आहे. दुसरी मुलगी 16 वर्षांची असून तिसरी मुलगी 12 वर्षांची आहे. तर लहान मुलगा 8 वर्षांचा आहे. पती मुंबईत टाईल्सचा काम करत होते. ते बाहेर राहत असल्यानेच प्रेमप्रकरण सुरु झालं.
आधीही प्रियकरासोबत झाली होती फरार
पतीने हे ही म्हटलं की, पत्नी याआधीही घर सोडून प्रियकरासोबत पळून गेली होती. पण त्यानंतर तिने रडत रडत माफी मागितली आणि ती परत आली होती. पुन्हा असं काही घडणार नाही, असंही ती म्हणाली. पण काही दिवसानंतर ती पुन्हा पळून गेली. आता पतीने स्पष्ट म्हटलं आहे की, जर पत्नी पुन्हा परत आली, तर तो पुन्हा तिला स्वीकारणार नाही. आता विश्वास नाही आहे. मुलांना घेऊन मी राहील. तिने तिचा निर्णय घ्यावा.