मुंबईची खबर: सेंट्रल रेल्वेच्या 'या' स्थानकावर प्लॅटफॉर्मचा विस्तार होणार! आता, 15 डब्यांच्या लोकल ट्रेनमध्ये वाढ...

मुंबई तक

सेंट्रल रेल्वे (मध्य रेल्वे) च्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरील प्लॅटफॉर्म 5 आणि 6 च्या विस्ताराचं काम अखेर सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

15 डब्यांच्या लोकल ट्रेनमध्ये वाढ...
15 डब्यांच्या लोकल ट्रेनमध्ये वाढ...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सेंट्रल रेल्वेच्या 'या' स्थानकावर प्लॅटफॉर्मचा विस्तार होणार!

point

आता, 15 डब्यांच्या लोकल ट्रेनमध्ये वाढ...

Mumbai News: मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सेंट्रल रेल्वे (मध्य रेल्वे) च्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वरील प्लॅटफॉर्म 5 आणि 6 च्या विस्ताराचं काम अखेर सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने बोरिवली टोकाकडे असलेली सुमारे 40 वर्षे जुनी जीर्ण सिग्नल इमारत पाडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

पायाभूत सुविधांचं काम सुरू होणार... 

बोरिवलीतील ही इमारत बऱ्याच काळापासून वापरात नव्हती आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकाच्या प्लॅटफॉर्म विस्तारात एक मोठा अडथळा होती. संबंधित इमारत पाडून टाकल्यानंतर, स्थानकांवरील पायाभूत सुविधांचं काम लवकर सुरू होऊ शकतं. सेंट्रल रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील दोन प्लॅटफॉर्म्सच्या विस्ताराचं काम बऱ्याच काळापासून सुरू होतं. 

हे ही वाचा: 19 Minute Viral Video पाहू नका, सेव्ह करू नका आणि शेअर तर अजिबातच नाही; ज्यांनी फॉरवर्ड केला त्यांना तर...

दोन प्लॅटफॉर्म्सचा विस्तार होणार 

प्लॅटफॉर्म 5 आणि 6 च्या विस्तारामुळे दोन्ही प्लॅटफॉर्मवर 15 डब्यांच्या लोकल ट्रेन चालवण्यास परवानगी मिळेल. सध्या, प्लॅटफॉर्म 7 हा सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) वरील एकमेव प्लॅटफॉर्म आहे ज्यावरून, 15 डब्यांच्या लोकल ट्रेन धावतात. प्रवाशांची वाढती संख्या आणि गर्दी लक्षात घेता, सेंट्रल रेल्वे CSMT वरील दोन अतिरिक्त प्लॅटफॉर्म 15 डब्यांच्या लोकल ट्रेनसाठी योग्य बनवण्याच्या योजनेवर बऱ्याच काळापासून काम करत होती. 

हे ही वाचा: Govt Job: भारतीय सैन्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी! इंडियन आर्मीच्या नव्या प्रोग्रामसाठी लवकरच करा अप्लाय...

स्थानकावरील वर्दळीच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल 

प्लॅटफॉर्मच्या या नवीन विस्तारामुळे रेल्वेची क्षमता वाढेल आणि गर्दीच्या वेळी प्रवाशांची गर्दी कमी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. उपनगरीय नेटवर्कची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील वाढत्या ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचं मानलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबईतील सर्वात वर्दळीचं रेल्वे स्थानक आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे लाखो प्रवाशांना चांगला फायदा होणार असल्याची अपेक्षा आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp