दहावीच्या विद्यार्थ्याला आवडू लागली आठवीची मुलगी, नंतर तिच्याशी नको तेच... अश्लील फोटो बनवत केलं ब्लॅकमेल

मुंबई तक

Crime News : दहावीच्या एका विद्यार्थ्याने आठवीच्या विद्यार्थीनीचे अश्लील फोटो बनवत ब्लॅकमेल केले आणि त्याच्या आईचे लाखोंचे दागिने चोरल्याचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रेयसीला इंटिमेट सीन दाखवून केलं ब्लॅकमेल

point

चोरीनंतर कुटुंबाकडून मुलीची चौकशी

Crime News : सहा महिन्यांपूर्वी फिरोजाबादमध्ये इयत्ता दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने एका मुलीला डीजेवर नाचताना पाहिले. ती मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. तिचा नाच पाहून मुलगा तिच्या प्रेमात पडला. त्यांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे नात्यात रुपांतर झाले हे दोघांनाही कळाले नाही. ते रोज एकमेकांसोबत बोलू लागले होते. दरम्यान, त्या मुलाने मुलीचे आक्षेपार्ह स्थितीत फोटो काढण्यात आले. 

हे ही वाचा : महाराष्ट्रातून लहान मुलं, मुली पळवल्या जातायत, राज ठाकरेंनी एनसीआरबी अहवालाचा दाखला देत फडणवीसांना सुनावलं..

प्रेयसीला इंटिमेट सीन दाखवून केलं ब्लॅकमेल

मुलाने आपल्या प्रेयसीला इंटिमेट सीन दाखवून अनेकदा ब्लॅकमेल केलं होतं. हे सर्व ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि तिला भिती वाटू लागली होती. आरोपीने तिला काहीतरी वस्तू चोरण्यास सांगितली होती, हे ऐकून मुलीने आपल्या आईकडून तब्बल दीड लाख रुपयांहून अधिक किंमतीचे सोन्याचे दागिने चोरले आणि ते मुलाला दिले.

चोरीनंतर कुटुंबाकडून मुलीची चौकशी

दागिन्यांची चोरी केल्यानंतर कुटुंबाला संशय आला आणि त्यांनी आपल्या मुलीची चौकशी केली. तेव्हाच त्यांना कळले तिने चोरीचे दागिने घेतले होते आणि नंतर तिने तरुणाला दिले होते. गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपी मुलाला लगेच अटक करण्यात आली. त्याच्याकडून दागिनेही जप्त करण्यात आले.

हे ही वाचा : कराड हादरलं! भाच्याने भरचौकात मामावर चाकूने केले वार, हल्ल्यात मामाचा दुर्दैवी अंत

या प्रकरणात, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शिवशंकर प्रसाद म्हणतात की, आरोपी मुलाची कसून चौकशी केली जात असून कुटुंबातील सदस्यांना आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या मोबाईलवरील हालचालींवर आणि त्यांच्या मित्रांवर कडक नजर ठेवण्याची विनंती केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp