वहिनीसोबत वाद, संतापलेल्या दीराने 3 वर्षीय पुतणीचा गळा चिरला, पुतण्याला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं
Crime News : हिमांशू हा दारूच्या व्यसनामुळे घरात नेहमी वाद-विवाद घडवत असे. गुरुवारीही तो मद्यप्राशन करून आला आणि नेहमीप्रमाणे भाऊ अरुण व वहिनी मंजू यांच्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वहिनीने विरोध केला असता त्याचा संताप अनावर झाला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वहिनीसोबत वाद, संतापलेल्या दीराने 3 वर्षीय पुतणीचा गळा चिरला
पुतण्याला दुसऱ्या मजल्यावरुन फेकलं
Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून संतापलेल्या दीराने स्वतःच्या पुतणीचा गळा चिरून खून केला, तर पुतण्याला घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली फेकून दिलं. तीन वर्षांची पुतणीचा जागीच मृत्यू झाला असून पाच वर्षांचा मयंक हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ही घटना मंडावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या राजपूर नवादा गावातील आहे. येथे जयपाल सिंह हे सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे दोन मुलं, अरुण व हिमांशू, कुटुंबासह राहतात. हिमांशू हा दारूच्या व्यसनामुळे घरात नेहमी वाद-विवाद घडवत असे. गुरुवारीही तो मद्यप्राशन करून आला आणि नेहमीप्रमाणे भाऊ अरुण व वहिनी मंजू यांच्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वहिनीने विरोध केला असता त्याचा संताप अनावर झाला. याच रागात हिमांशू थेट घराच्या दुसऱ्या मजल्यावर गेला. तिथे खेळत असलेल्या तीन वर्षांच्या मानवीचा धारदार वस्तूने गळा चिरून खून केला. त्यानंतर पाच वर्षांच्या मयंकला उचलून दोन मजल्यावरून खाली फेकून दिलं.
हेही वाचा : मुंबई : फेसबुकवर मैत्री, नंतर महिलेचा whatsapp वर अर्धनग्न होऊन व्हिडीओ कॉल, अन् व्हायरलची धमकी देत लुटलं
गंभीर जखमी झालेल्या मयंकचा उपचार सुरू
मयंकच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच त्याची आई मंजू आणि वडील अरुण धावत गेले. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. घटनेनंतर हिमांशू घरातून पसार झाला होता. कुटुंबीयांनी त्याच्याविरुद्ध खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला.










