बलात्कार झाल्यानंतर मुलीने भितीपोटी शिक्षण थांबवलं, बीडमधील धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Beed Crime News : घटना घडून 14 दिवस उलटूनही पीडितेला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले नव्हते, ही बाब गंभीर मानली जात आहे. समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी अल्पवयीन पीडितेला 24 तासांत समितीकडे आणणे बंधनकारक असल्याचे सांगितले.

ADVERTISEMENT

Beed Crime News
Beed Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बलात्कार झाल्यानंतर मुलीने भितीपोटी शिक्षण थांबवलं

point

बीडमधील धक्कादायक प्रकार; नेमकं काय घडलं?

Beed Crime : बीडमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली असून, या घटनेनंतर पीडित मुलीच्या पालकांनी भीतीमुळे तिचे शिक्षण बंद केले आहे. अलीकडेच मालेगाव आणि शिरूर येथील अशाच प्रकरणांनी समाज हादरला असताना बीडमधील ही घटना पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.

नेमकं काय घडलं?

5 नोव्हेंबर रोजी पीडितेची आई कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुलगी खेळत होती. आई परतल्यावर ती घरातून गायब असल्याचे दिसले. त्यामुळे शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार नोंदवण्यात आली. नंतर मुलगी मामाकडे गेल्याचे समजल्याने हा गुन्हा निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. 22 नोव्हेंबर रोजी या संदर्भात पत्रही पाठवण्यात आले होते. परंतु 26 नोव्हेंबरला परिस्थिती बदलली. मुलगी थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचली आणि तिच्यावर बलात्कार झाल्याचे धाडसाने सांगितले. तिने ओळखीचा सूरजकुमार धोंडीराम खांड (22, रा. म्हाळसजवळा) याने तिच्यावर जबरदस्ती केल्याचे सांगितले. तक्रारीच्या आधारे अपहरणाच्या गुन्ह्यात POCSO व अॅट्रॉसिटीची कलमे वाढवण्यात आली. आरोपीला तeत्काळ अटक करण्यात येऊन तो न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा : नंदुरबार: डोळ्यात अंजन घालणारं वास्तव! बाण, बांबू आणि ब्लेडने करतात प्रसूती… हो हे घडतंय तुमच्या-आमच्या महाराष्ट्रात!

बालकल्याण समितीकडे नेण्यात विलंब

घटना घडून 14 दिवस उलटूनही पीडितेला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले नव्हते, ही बाब गंभीर मानली जात आहे. समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांनी अल्पवयीन पीडितेला 24 तासांत समितीकडे आणणे बंधनकारक असल्याचे सांगितले. अशा वेळी मुलीला मानसिक आधार, संरक्षण आणि त्वरित समुपदेशन आवश्यक असते, जे वेळेत केले असते तर मुलीचा मानसिक ताण कमी झाला असता, असे तज्ज्ञांचे मत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp