नाशिक : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय, पतीने बुटाच्या लेसने गळा आवळला; जागेवर संपवलं
Nashik Crime : गुरुवारी दुपारच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर नितीनने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत शीतलचा गळा लेसने आवळून तिचा जीव घेतला, असा तपास पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नाशिक : पत्नीचं अफेअर असल्याचा संशय
पतीने बुटाच्या लेसने गळा आवळला; जागेवर संपवलं
Nashik Crime : नाशिकच्या पंचवटी परिसरात चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्निची हत्या केल्याची हादरवून सोडणारी घटना गुरुवारी (11 डिसेंबर) उघडकीस आली. या प्रकरणात संशयित पती नितीन उत्तम भामरे याने मद्यधुंद अवस्थेत बुटाच्या लेसचा वापर करून पत्नी शीतल भामरे हिचा गळा आवळून खून करून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या पंचवटी पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
भामरे दाम्पत्य पंचवटीतील ढिकले वाचनालयाच्या रस्त्यावर कुटुंबासह वास्तव्यास होते. गुरुवारी दुपारच्या सुमारास पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर नितीनने मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत शीतलचा गळा लेसने आवळून तिचा जीव घेतला, असा तपास पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात केला आहे. आरोपीने हत्या केल्यानंतर घराचा दरवाजा बाहेरून कुलूप लावले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील आणि संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचवटी पोलिस ठाण्यात नितीन भामरेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे.
हेही वाचा : पुणे : आरोपी बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय










