पुणे : आरोपी बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय

मुंबई तक

Bandu Andekar : आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी असलेला बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार असणार आहे, निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाने त्याला परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Bandu andekar
Bandu andekar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी निवडणूक लढणार

point

न्यायालयाने दाखवला हिरवा कंदील

Bandu Andekar : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी असलेला बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उभा राहणार आहे. विशेष मकोका न्यायालयाने महापालिका निवडणूक लढवण्यासाठी हिरवा कंदील दर्शवल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रकरणात माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरचा नाना पेठेत खून करण्यात आला होता. 

हे ही वाचा : तरुणांनी झोमॅटोवरून मागवलं चिकन, जेवनातच आढळली पाल, नंतर तरुणाला झाल्या उल्ट्या अन्...

निवडणूक लढवण्यासाठी कायदेशीर प्रतिबंधता नाही

या प्रकरणात बंडू आंदेकर यांच्यासह पंधरा आरोपींना अटक करण्यात आली होती. आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. संबंधित प्रकरणात महत्त्वाची बाब म्हणजे वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते. त्यांच्यावर नुकताच मध्यंतरी हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता, न्यायालयाने नमूद केले की, आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही कायदेशीर प्रतिबंधता नाही.

न्यायालयाने आपल्या आदेशात काय म्हटलं? 

अशातच आता महापालिका निवडणूक लढवण्याचा अधिकार त्यांनी मान्य केल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रकरणाची नामांकन प्रक्रिया पार पडण्यासाठी आरोपी पोलीस बंदोबस्ताची मागणी करू शकतात. सध्याची परिस्थिती पाहताच निर्णय घेतला जाईल, असंही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे.

हे ही वाचा : दारूच्या नशेत बोगस डॉक्टर, You Tube वर व्हिडिओ बघून केलं ऑपरेशन, नंतर रुग्णाचा दुर्दैवी अंत

लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार, आरोपींना निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्याचा हक्का आहे, असा युक्तिवाद वकील. चव्हाण यांनी केला, हा युक्तिवाद ग्राह्य धरणे हे न्यायालयाच्या नियमात असल्याचं बोललं जातंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp