Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट कायम, तर 'या' विभागातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
maharashtra weather : महाराष्ट्रात एकूणच कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, 12 डिसेंबर रोजी राज्याच्या अंतर्गत भागात थंडावा कायम राहणार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
महाराष्ट्रात एकूणच कोरडे हवामान
भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार काय सांगतं हवामानाचा अंदाज
Maharashtra Weather : महाराष्ट्रात एकूणच कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, 12 डिसेंबर रोजी राज्याच्या अंतर्गत भागात थंडावा कायम राहणार आहे, तर किनारी भागात सामान्य हवामान राहील. परंतु सकाळी काही ठिकाणी हलके धुके असण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : पुणे : आरोपी बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय
कोकण विभाग :
कोकण विभागात मुख्यत्वे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबई यांचा समावेश होतो. या पैकी मुंबईत थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे.
मध्य महाराष्ट्र विभाग :
मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच बीड आणि लातूर या दोन जिल्ह्यांत हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज जारी केला आहे.










