शिर्डी : साईबाबा मंदिरातील नाण्यांच्या प्रश्नावर RBI ने सुचवला मोठा उपाय
प्रसिद्ध श्री. साईबाबा मंदिरापुढील (Shri Saibaba Sansthan Trust) लाखो रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोडविला
ADVERTISEMENT
शिर्डी : येथील प्रसिद्ध श्री. साईबाबा मंदिरापुढील (Shri Saibaba Sansthan Trust) लाखो रुपयांच्या नाण्यांचा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोडविला आहे. रिझर्व्ह बँकचे बेलापूर शाखेचे जनरल मॅनेजर मनोज रंजन दास यांनी नुकतीच श्री. साईबाबा संस्थान ट्रस्ट आणि शिर्डीतील 13 राष्ट्रीयीकृत बँकांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. संयुक्तरित्या पार पडलेल्या या बैठकीत नाण्यांवर तोडगा निघाला असल्याची माहिती संस्थानने दिली. (Reserve Bank of India has resolved the coin crisis at Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi)
ADVERTISEMENT
काय निघाला तोडगा?
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ज्या भागात नाण्यांचा तुडवडा आहे, त्या भागात शिर्डीतील राष्ट्रीयीकृत बँकेत पडून असलेली संस्थानची कोट्यावधी रुपयांची नाणी वितरित केली जाणार आहे. यामुळे शिर्डीतील बँकांचा नाण्यांचा बोजा कमी होणार आहे. यानंतर रिकाम्या झालेल्या जागेवर पुन्हा संस्थानची दान रक्कम स्वीकारण्यात येणार आहे.
हे ही वाचा : 22 मजले, Sea View… मुकेश अंबानींनी कोणाला गिफ्ट केलं 1500 कोटींचं घरं?
साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितल्यानुसार, रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपामुळे नाण्यांच्या प्रश्नाचे निराकरण करण्यात मदत झाली. “आता आम्हाला आशा आहे की ज्या चार बँकांनी आमच्याकडून नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता, त्या बँकेने सुचविलेल्या तोडग्यानुसार पुढे येतील.
हे वाचलं का?
शिर्डी संस्थानमध्ये नाण्यांचा प्रश्न :
शिर्डीच्या प्रसिद्ध श्री. साईबाबा मंदिराला पैसे ठेवण्यास जागा नव्हती. यामुळे मंदीर प्रशासनाने थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पत्र लिहुन मदतीची मागणी केली होती. राहुल जाधव यांनी सांगितल्यानुसार, भाविकांनी अर्पण केलेली नाणी ठेवण्यासाठी मंदिरामध्ये जागा अपुरी पडत आहे. बँकांनीही ही नाणी स्वीकारण्यास नकार दिला होता. संस्थान ट्रस्टची खाती असलेल्या सरकारी बँकांनी ट्रस्टकडून नाणी स्वीकारण्यास नकार दिला आहे. बँकामध्येही ही नाणी ठेवण्यासाठी जागा नसल्याचे कारण बँकांन दिले होते. श्री साईबाबा ट्रस्टची 13 विविध सरकारी शाखांमध्ये खाती आहेत. यातील बहुतांश शिर्डीत आहेत, एक शाखा नाशिकमध्ये आहे.
हे ही वाचा : भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; कसा असणार यावर्षीचा पाऊस?
श्री. साईबाबा संस्थान ट्रस्टला नाण्यांच्या 50 पैशांपासून ते 10 रुपयांपर्यंतच्या नाण्यांच्या रूपात दरमहा 28 लाख रुपये मिळतात. सध्या ट्रस्टकडे नाण्यांच्या स्वरूपात सुमारे 11 कोटी रुपये विविध बँकांमध्ये जमा आहेत. संस्थानला दरवर्षी कोट्यवधी रुपयांची देणगी मिळते. 2022 मध्ये भाविकांनी मंदिरात 400 कोटी रुपयांची देणगी दिली होती. ही देणगी रोख, धनादेश आणि डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात होती. याशिवाय ऑनलाइन पेमेंटही करण्यात आले तसेच भाविकांकडून सोने-चांदीचेही दान करण्यात आले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT