भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत जाहीर; कसा असणार यावर्षीचा पाऊस?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Tradition of future prediction in Bhendwal Buldhana
Tradition of future prediction in Bhendwal Buldhana
social share
google news

बुलढाणा : जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळच्या (Bhendwal) घट मांडणीचे भाकीते आज (रविवारी) जाहीर झाले. सकाळी 6 वाजता सूर्योदयावेळी चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी या घट मांडणीचे निरीक्षण करून यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली. या भाकितानुसार जून महिन्यामध्ये पाऊस कमी असणार आहे, त्यामुळे पेरणीची सुरुवात उशीरा होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर जुलैमध्ये साधारण आणि ऑगस्टमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊसाचे भाकीत वर्तवण्यात आले आहे. त्यानंतर पावसाच्या चौथ्या म्हणजे सप्टेंबर महिन्यातही कमी पावसाचा अंदाज आहे. (Tradition of future prediction in Bhendwal Buldhana)

पिकांबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण स्वरूपाची असतील असे सांगण्यात आले आहे. मात्र उत्पन्न चांगलं असलं तरी अवकाळीने या पिकांना फटका बसणार असल्याचे भाकीत यंदाच्या भविष्यवाणीमध्ये वर्तवण्यात आलं आहे. याशिवाय राजकीय परिस्थितीवरही भाकीत करण्यात आले आहे. यामध्ये देशाचा राजा कायम असणार असे सांगण्यात आले आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचा या घटमांडणी आणि यातील भाकितावर विश्वास असल्याच चित्र आहे. तर दुसऱ्या बाजूला भेंडवळची घटमांडणी एक थोतांड असल्याचं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलं आहे.

कौटुंबिक जीवनाचा त्याग,उद्योगपतीच्या दोन मुली होणार साध्वी, कारण काय?

भेंडवळच्या घट मांडणीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही :

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भेंडवळच्या घटमांडणीला थोतांड म्हणतं ही भाकिते मांडणाऱ्या वाघ महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे भेंडवळची घटमांडणी वादात सापडली आहे. मागील वर्षी केलेली सर्व भाकिते फोल ठरली असल्याचाही दावा अंनिसने केला आहे. भेंडवळच्या या घट मांडणीला कुठलाच वैज्ञानिक आधार नसून त्या महाराजांना नीलावती विद्या प्राप्त असल्याचं सांगितलं जातं ते सुद्धा साफ खोट आहे, असंही अंनिसने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अन् अस्वलाला समोर पाहून बिबट्याही घाबरला… ताडोबातील थरारक Video!

बुलढाण्यात जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठावरील भेंडवळ गावात मागील 370 वर्षांपासून घटमांडणीची परंपरा जोपासली जाते. दरवर्षी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर घटमांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी या घटात झालेल्या बदलावरून भविष्य वर्तविण्यात येते. यातील पाऊस आणि हवामानाच्या भाकिताकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं असतं. या भाकितावरून शेतकरी आपल्या वर्षभराच्या पीक-पाण्याचे नियोजन करत असतो.370 वर्षांच्या या परंपरेला आता पुंजाजी महाराज वाघ आणि सारंगधर महाराज पुढे नेत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT