Uddhav Thackeray: 'रात्री कट कारस्थानं करून माझं सरकार..', PM मोदींवर ठाकरेंचा थेट आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

'रात्री कट कारस्थानं करून माझं सरकार..', PM मोदींवर ठाकरेंचा थेट आरोप
'रात्री कट कारस्थानं करून माझं सरकार..', PM मोदींवर ठाकरेंचा थेट आरोप
social share
google news

Lok Sabha Election 2024 Uddhav Thackeray: सांगली: लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्रातील प्रचार आता शिगेला पोहचला आहे. एकीकडे महाविकास आघाडीने झंझावाती प्रचार सुरू केलेला असताना दुसरीकडे स्वत: पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंबाबत सौम्य धोरण स्वीकारत त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. पण याचवेळी भाजपला कोणतीही सहानुभूती मिळू नये यासाठी उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. (lok sabha election 2024 my government was brought down by conspiracies at night uddhav thackeray directly accuses pm modi)

ADVERTISEMENT

'मी हात-पाय हलवू शकत नव्हतो तेव्हा रात्रीची सगळी कट कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं.. आणि आज माझी स्तुती करतायेत.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केला आहे. 

पाहा सांगलीच्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले.. 

'भाजपला सांगतोय की, उद्याचं येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं असेल.. आजपर्यंत कधीही संकट आलं तेव्हा मोदीजी तुम्हाला महाराष्ट्रात दिसले होते कुठे?' 

हे वाचलं का?

हे ही वाचा>> शिंदेंना सोडाव्या लागल्या 'या' 8 जागा, शिवसैनिक काय देणार कौल?

'अगदी महापूर आला.. विश्वजीत मी तेव्हा तुझ्या मतदारसंघात येऊन गेलो होतो. अवकाळी आला, आपत्ती आली.. कधी मोदीजी दिसले आपल्याला सांगलीत? नाही.. अमित शाह कधी दिसले, नाही..'

'पण त्यांना आता कळतंय की, महाराष्ट्रात आपलं काही खरं नाही. कारण अश्वमेधाचा त्यांचा तो घोडा नाही ते खेचर आहे.. ते महाराष्ट्र थांबवणार आणि उलटं परत पाठवणार.. गो बॅक.. नाही चालणार इकडे', असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

ADVERTISEMENT

'मी हात-पाय हलवू शकत नव्हतो तेव्हा...', उद्धव ठाकरेंचा घणाघात

'आज माझी स्तुती केली असं मला कोणीतरी सांगितलं.. माझी स्तुती वैयक्तिक नका करू. माझ्या शिवसेनेची स्तुती करा.. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधान पदासाठी पहिल्यांदा पाठिंबा दिला त्या शिवसेनेचं कौतुक करा.. एका बाजूला माझी शिवसेना ही नकली शिवसेना बोलायचं..' 

ADVERTISEMENT

'माझी तब्येत बरी नव्हती.. तुमची सहानुभूती पाहिजे म्हणून नव्हे.. पण मी हात-पाय हलवू शकत नव्हतो तेव्हा रात्रीची सगळी कट कारस्थानं करून माझं सरकार तुम्ही खाली खेचलं.. आणि आज माझी स्तुती करतायेत.'

असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी यावेळी केला आहे.

'10 वर्षात ईडी, सीबीआयची मस्ती त्यांनी दाखवली'

'त्यांनी सांगितलं की, आमच्याकडे खूप चेहरे आहेत.. म्हणाले की, इंडिया आघाडी दरवर्षी पंतप्रधान बदलतील. अहो एवढं वैचारिक दारिद्र्य आमच्याकडे आलेलं नाही..' 

'माझा उलट प्रश्न असा आहे की, या देशाने एक जागतिक विक्रम केला आहे.. तो म्हणजे संपूर्ण जगात आपली लोकसंख्या नंबर 1 आहे.. 140 कोटीच्या वर आहे. 140 कोटी जनतेमध्ये एकच चेहरा घासून पुसून पुन्हा पंतप्रधान पदी बसवणार?'

हे ही वाचा>> माझ्यावर बाळासाहेबांचं कर्ज, ते मी कधीही..: PM मोदी

'10 वर्ष आपल्या आयुष्यातील.. मला काही तरुणांचे फोन येतात, काही बातम्या कळतात.. ते म्हणतात मी पहिलं मतदान केलं तेव्हा मी बेकार होतो.. 22 वर्षांचा होतो. आज 10 वर्ष झाली 32 वर्षांचा होत आलो.. नोकरी मिळेल या आशेने यांना मतदान केलं.. नोकरी मिळणं तर दूरच राहिलं पण महागाई एवढी वाढलीय की, मी माझ्या घरच्यांना भार झालोय की, काय असं वाटायला लागलं.' 

'मोदींपेक्षा ताकदवान या क्षणाला तुम्ही आहात आणि तुमचं एक बोट सरकार बदलू शकतो. आजपर्यंत 10 वर्षात ईडी, सीबीआयची मस्ती त्यांनी दाखवली. आता ती मस्ती तुम्ही एका बोटाने उडवून टाकू शकता.' अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. 

'इंडिया आघाडीचे 300 च्या वर खासदार निवडून येणार...'

'भाजपला सांगतोय की, सगळे दिवस सारखे नसतात. उद्याचं येणारं सरकार हे इंडिया आघाडीचं असेल. इंडिया आघाडीचे खासदार हे तुम्हाला आज खोटं वाटेल.. पण देशभर वातावरण पाहिल्यानंतर इंडिया आघाडीचे 300 च्या वर खासदार निवडून आल्याशिवाय राहत नाही हे तुम्ही आज लिहून ठेवा..' 

'आम्ही पोकळ नारे देत नाही.. 400 पार वैगरे नाही.. आम्ही कोणताच नारा देत नाही. आता संपूर्ण देशातील जनतेने नारा दिला आहे की, अब की बार भाजप तडीपार...' असा दावाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT