आशिष शेलार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, 'या' वेबसिरीजवर बंदी घालण्याची मागणी

मुंबई तक

Ashish Shelar writes to Chief Minister Devendra Fadnavis : "देवखेळ" ही वेबसिरिज नुकतीच झी 5 या ओटीटीवर प्रसारित करण्यात आली आहे. ही वेबसिरिज रत्नागिरी जिल्ह्यातील "नमन-खेळे" या लोकलेचे विपरीत चित्रण करणारी व या लोककलेतील लोकदैवत ठरलेल्या "शंकासूर" या प्रमुख पात्राचे अवमानकारक चित्रण करणारी आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या वेबसिरिजला कोकणातून तिव्र विरोध करण्यात येतो आहे. या लोकलेचे जतन संवर्धन करणाऱ्या कलावंताच्या विविध संघटनांनी त्याला विरोध करुन सरकार म्हणून मला निवेदनेही दिली आहेत.

ADVERTISEMENT

Ashish Shelar writes to Chief Minister Devendra Fadnavis
Ashish Shelar writes to Chief Minister Devendra Fadnavis
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आशिष शेलार यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र

point

'या' वेबसिरीजवर बंदी घालण्याची मागणी

Ashish Shelar writes to Chief Minister Devendra Fadnavis : "देवखेळ वेबसिरिज मुळे पौराणिक व खूप जुन्या लोकपरंपरेला धक्का लागला असल्याची जनमानसात भावना तीव्र दिसून येत आहे. या वेबसिरिजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत असून वेबसिरिज विरोधात वाढता रोष व कोकणात मोठ्या उत्साहात साजरा होणारा शिमग्याचा सण जवळ आला असताना अशाप्रकारचे गढूळ वातावरण निर्माण होणे योग्य नाही. म्हणूनच आपण याबाबत लक्ष घालून तातडीने योग्य व उचित कारवाई करावी ही विनंती", अशी मागणी मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात काय म्हटलंय? सविस्तर जाणून घेऊयात..

मंत्री आशिष शेलार यांचं पत्र जसंच्या तसं

"देवखेळ" ही वेबसिरिज नुकतीच झी 5 या ओटीटीवर प्रसारित करण्यात आली आहे. ही वेबसिरिज रत्नागिरी जिल्ह्यातील "नमन-खेळे" या लोकलेचे विपरीत चित्रण करणारी व या लोककलेतील लोकदैवत ठरलेल्या "शंकासूर" या प्रमुख पात्राचे अवमानकारक चित्रण करणारी आहे, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या वेबसिरिजला कोकणातून तिव्र विरोध करण्यात येतो आहे. या लोकलेचे जतन संवर्धन करणाऱ्या कलावंताच्या विविध संघटनांनी त्याला विरोध करुन सरकार म्हणून मला निवेदनेही दिली आहेत.

हेही वाचा : तीन वर्षांपासून मुस्लिम तरुणीसोबत अफेअर पण, शेवटी घडलं भयानक अन् रेल्वे ट्रॅकवर तुकड्यांमध्ये तरुणाचा मृतदेह...

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील नमन खेळे ही अत्यंत लोकप्रिय व पौराणिक लोककला असून सामाजिक आणि धार्मिक महत्त्व प्राप्त झालेली ही हिंदू प्रथा परंपरा जतन करणाऱ्या लोककलेती एक अग्रगण्य लोककला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामदैवतांशी या लोककलेचा थेट संदर्भ असल्याने त्याला धार्मिक दृष्टीने एक पावित्र्य व अधिष्ठान ही प्राप्त झाले आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्यामार्फत ही कला जतन व संवर्धन करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. कोकणात शिमग्यात या कलेचा जागर सर्वत्र होत असल्याने ९ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे आपल्या शासनातर्फे या नमन कलेचा महोत्सव ही आयोजित करण्यात आला आहे. या कलेत योगदान देणाऱ्या कलावंतांना आपण राज्य शासनाचे पुरस्कार देऊन सन्मानित करतो तसेच तसेच वृध्द कलावंत मानधन योजनेतही या कलेचा समावेश शासनाने केलेला आहे. महाराष्ट्र शासनाने सन्मान केलेली ही लोककला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp