Nanded: कुऱ्हाडीने EVM फोडलं, मतदान केंद्रात भयंकर घटना...नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

nanded news angry boy broken evm machines with axe biloli district ramtirtha polling center
भैय्यासाहेब एडके या तरूणाला ताब्यात घेतले. बेरोजगारीला कंटाळून भैय्यासाहेबने हे कृत्य केल्याची माहिती आहे.
social share
google news

Nanded Boy broken EVM Machines with axe : कुवरचंद मंडले, नांदेड : राज्यात आज दुसऱ्या टप्प्यात मतदान सूरू असताना नांदेड जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. मतदानासाठी आलेल्या एका तरूणाने कुऱ्हाडीने व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडलीय.नांदेडच्या बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तरूणाला ताब्यात घेतले आहे. भैय्यासाहेब एडके असे या तरूणाचे नाव आहे. भैय्यासाहेब एडके याने बेरोजगारीला कंटाळून हे कृत्य केल्याची माहिती आहे. या घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.  (nanded news angry boy broken evm machines with axe biloli district ramtirtha polling center) 

ADVERTISEMENT

नांदेड लोकसभा मतदार संघात सकाळपासून शातंतेत मतदान सुरू होते. यावेळी संध्याकाळी 4 च्या सुमारास रामतीर्थ मतदान केंद्रावर भैय्यासाहेब एडके हा तरूण मतदानासाठी आला होता. भैय्यासाहेब एडके केंद्रात शिरताच त्याने कुऱ्हाड बाहेर काढली. तरूणाच्या हातातील कुऱ्हाड पाहून मतदान केंद्रातील निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तेथून पळ काढला होता. त्यानंतर भैय्यासाहेब एडके केंद्रातील ईव्हीएम मशीनसह, व्हीव्हीपॅट व इतर साहित्याची कुऱ्हाडीने तोडफोड करून नासधुस केली होती.

हे ही वाचा : Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या धामधूमीत ठाकरे अडचणीत!

या सर्व घटनेची माहिती अधिकाऱ्यांनी पोलिसांना देताच, तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन भैय्यासाहेब एडके या तरूणाला ताब्यात घेतले. बेरोजगारीला कंटाळून भैय्यासाहेबने हे कृत्य केल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

हे वाचलं का?

दरम्यान आपण एम.ए.चे शिक्षण घेऊन देखील बेरोजगार असून या सरकारमुळेच बेरोजगारी निर्माण झाल्याचा राग मनात धरून आपण हे कृत्य केल्याचे आरोपी भैय्यासाहेब एडके यांने पोलिसांना सांगितले. सदर घटना ही दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. तोपर्यंत एकूण 379 मतदारांपैकी 185 मतदारांनी या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्याचे निवडणूक अधिकारी सुबोध थोरात यांनी सांगितले. 

हे ही वाचा : Lok Sabha 2024 : शिवसेना-राष्ट्रवादीनेच केला काँग्रेसचा 'कार्यक्रम' ?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT