EVM Case : सुप्रीम कोर्टाचा झटका! EVM ला क्लिनचीट, न्यायालयाचा फैसला काय?
Supreme Court Judgment On EVM-VVPAT Verification : सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी स्लिप पडताळणी मागणीसंदर्भात महत्त्वाचा निकाल दिला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी फेटाळली

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात काय?
News about EVM, Supreme Court and VVPAT : लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. शुक्रवारी (26 एप्रिल) सर्वोच्च न्यायालयाने व्हीव्हीपीएटी पडताळणीची मागणी करणाऱ्या याचिकेसह तीन याचिका फेटाळल्या. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारी याचिकाही फेटाळण्यात आली आहे. (Supreme Court Big Verdict on EVM-VVPAT case. Supreme Court rejects pleas seeking 100% cross verification)
सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे व्हीव्हीपीएटी स्लिप आणि ईव्हीएमद्वारे टाकण्यात आलेली मते 100 टक्के जुळवण्याच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने एकमताने हा निकाल दिला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय?
ईव्हीएम मशीनद्वारेच मतदान होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आजच्या महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केले आहे. EVM-VVPAT ची 100 टक्के जुळवणी केली जाणार नाही. VVPAT स्लिप 45 दिवस सुरक्षित राहील. या स्लिप उमेदवारांच्या स्वाक्षरीने सुरक्षित ठेवल्या जातील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा >> "शरद पवार मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर पाठिंबा देणार होते"
निवडणुकीनंतर चिन्ह लोडिंग युनिट्सही सील करून सुरक्षित ठेवाव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक पथकाकडून ईव्हीएमचा मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम तपासण्याचा पर्याय उमेदवारांना असेल, जो निवडणूक जाहीर झाल्यानंतर सात दिवसांच्या आत करता येईल.