Sunil Tatkare : "शरद पवार मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर पाठिंबा देणार होते"
Sharad Pawar Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी असा दावा केला की, भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार पाठिंबा देणार होते.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
सुनील तटकरेंचा मुलाखतीत दावा
शरद पवार अजित पवारांना देणार होते पाठिंबा
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर सोडलं मौन
Sunil Tatkare Sharad Pawar : अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मंत्री आणि आमदारांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी उघड केले. भाजपबरोबर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णयाला पाठिंबा देणार होते, असा दावा तटकरे यांनी केला आहे. (Sunil Tatkare claimed that Sharad Pawar had going to support ajit Pawar's ncp when he joined the government with BJP)
ADVERTISEMENT
सुनील तटकरे यांनी 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत हा गौप्यस्फोट केला आहे. आपले खासदार निवडून आल्यानंतर पुन्हा शरद पवारांचा आशीर्वाद घ्यायला जाणार का? या प्रश्नाला उत्तर देताना तटकरेंनी हा दावा केला.
पवार देणार होते पाठिंबा, तटकरे काय बोलले?
सुनील तटकरे म्हणाले की, "आम्ही सत्तेत गेल्यानंतर पवार साहेबांना भेटायला गेलो. प्रदेशाध्यक्ष म्हणून मला राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्षांकडून सूचित करण्यात आले की, मंत्र्यांसह आपण पवार साहेबांना भेटायला जायचे आहे."
हे वाचलं का?
"आधी मंत्र्यांसह भेटलो. परत सांगण्यात आले की, आमदारांसह भेटायला जायचे आहे. त्याची स्क्रीप्ट कुणाची होती, ते माहिती नाही. पण त्याचा शेवट मला सांगितला होता. आम्ही घेतलेल्या निर्णयाला पवार साहेब समर्थन देणार होते, यात तथ्य असून, यावर अधिक प्रकाश प्रफुल्ल पटेल टाकू शकतील", असे तटकरे म्हणाले.
"कुणी सांगितले की आम्ही स्वतः भेटायला गेलो, पण वेळ ठरल्याशिवाय भेटायला जाता येते का? हे दोन्ही बाजूने होते. वन वे (एका बाजूने) नव्हते", असे तटकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
छगन भुजबळांच्या माघारीवर तटकरे काय म्हणाले?
नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये तिढा आहे. छगन भुजबळ निवडणूक लढणार अशी चर्चा होती, पण त्यांनी माघार घेतली. याबद्दल बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, "भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते जेव्हा निवडणूक रिंगणात असतात, तेव्हा त्यांच्या उमेदवारीचा निर्णय लवकर होणे अपेक्षित असते. तो न झाल्याने भजुबळांनी माघार घेतली. पण, आम्ही या जागेवरील दावा सोडलेला नाही", असे तटकरे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT