आलिशान फार्महाऊस, शिर्डीतही जमीन जुमला, ओझर विमानतळाजवळही मालमत्ता; बलात्कारी बाबाची अब्जावधींची संपत्ती

मुंबई तक

Ashok Kharat Networth : अध्यात्म आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला असून त्याची कोट्यवधींची मालमत्ता असल्याची माहिती समोर आलीये. नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणात मोठी कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्या धक्कादायक कारनाम्यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ADVERTISEMENT

Ashok Kharat Networth
Ashok Kharat Networth
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आलिशान फार्महाऊस, शिर्डीतही जमीन जुमला, ओझर विमानतळाजवळही मालमत्ता

point

बलात्कारी बाबाची अब्जावधींची संपत्ती

Ashok Kharat Networth : नाशिकमधील राजकीय नेते आणि बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला पोलिसांनी बुधवारी (दि.18) अटक केली आहे. एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरातने तिला दिव्य शक्तींचे खोटे आमिष दाखवून आणि धार्मिक विधींच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढले. पीडितेला अमली पदार्थ मिश्रित अन्न देऊन आणि हिप्नोटाईज करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हा प्रकार 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत सातत्याने सुरू होता. आरोपीने पीडितेच्या पतीच्या जिवाचे भीती घालून तिला धमकावले होते, मात्र अखेर या प्रकरणात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भविष्याच्या नावाखाली 200 कोटींची माया

कॅप्टन खरातने गेल्या पाच वर्षांत अफाट संपत्ती जमा केल्याचे तपासात समोर येत आहे. अंकशास्त्र आणि भविष्याच्या नावाखाली त्याने केवळ राजकीय नेतेच नव्हे तर खाकी वर्दीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही आपल्या प्रभावाखाली आणले होते. या प्रभावाचा वापर करून त्याने जवळपास 200 कोटी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. नाशिकमधील पाथर्डी परिसरात त्याची सुमारे 150 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली 30 एकर जमीन असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. याशिवाय सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी आणि मीरगाव येथेही त्याची मोठी गुंतवणूक असून तिथे एक भव्य फार्महाऊस उभारण्यात आले आहे.

5 वर्षात बनला कोट्यधीश भोंदुबाबा खरात बनला 200 कोटींचा मालक

कॅप्टन अशोककुमारने अंकशास्त्राच्या आधारे राजकीय नेतेमंडळींचे नव्हे तर प्रशासनातील बडे अधिकारी, खाकी वर्दीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे  भविष्य सांगत, त्यांना सोबत घेत 200 कोटींची माया जमवली असल्याच्या अंदाज यंत्रणा वर्तवता आहे, 

खरातची स्थावर मालमत्ता - 

हे वाचलं का?

    follow whatsapp