मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील मौल्यवान दागिन्यांचा लिलाव, गणरायाला अर्पण केलेल्या दागिन्यांसाठी कोट्यवधी रुपयांची बोली
Siddhivinayak Jewellery Auction : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात श्रद्धेचा आणि मांगल्याचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. हिंदू नवीन वर्षाचे स्वागत करत असतानाच, बाप्पाला अर्पण करण्यात आलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा भव्य लिलाव पार पडला. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद मिळावा आणि दागिन्यांच्या रूपात प्रसाद घरी नेता यावा, यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मुंबई : सिद्धिविनायक मंदिरातील मौल्यवान दागिन्यांचा लिलाव
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोट्यवधी रुपयांच्या दागिन्यांची खरेदी
Siddhivinayak Jewellery Auction, दिपेश त्रिपाठी : चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात श्रद्धेचा आणि मांगल्याचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. हिंदू नवीन वर्षाचे स्वागत करत असतानाच, बाप्पाला अर्पण करण्यात आलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांचा भव्य लिलाव पार पडला. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाचा आशीर्वाद मिळावा आणि दागिन्यांच्या रूपात प्रसाद घरी नेता यावा, यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
हे ही वाचा : आलिशान फार्महाऊस, शिर्डीतही जमीन जुमला, ओझर विमानतळाजवळही मालमत्ता; बलात्कारी बाबाची अब्जावधींची संपत्ती
दोन कोटी रुपयांच्या दागिन्यांचा लिलाव
या लिलावात एकूण 234 प्रकारचे मौल्यवान अलंकार ठेवण्यात आले होते, ज्यांची अंदाजे किंमत तब्बल 2 कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये सुवर्ण नाणी, आकर्षक साखळ्या, नक्षीदार लॉकेट्स, ब्रेसलेट्स, चांदीच्या पादुका आणि बाप्पाचे लाडके वाहन असलेल्या 'उंदीर'याचाही समावेश होता. लिलावात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि उत्साह ओसंडून वाहात होता.
दागिने घरात येणे म्हणजे सुख-समृद्धी
भक्तांसाठी हे केवळ दागिने नसून बाप्पाचा साक्षात आशीर्वाद आहेत. हे दागिने घराच्या तिजोरीत असणे म्हणजे घरात सुख-समृद्धी येणे' अशी भक्तांची गाढ श्रद्धा आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एखादी वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते, त्यातही ती वस्तू जर सिद्धिविनायकाच्या चरणस्पर्श झालेली असेल, तर तिचा आनंद द्विगुणित होतो.










