Gold price: सोनं खरेदी करण्यासाठी अजूनही सुवर्णसंधी, एक तोळ्याचा आजचा भाव किती?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Gold-Silver Rate : सोनं खरेदी (Gold Rate) करण्याचा विचार करताय? मग तुमच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सोन्याच्या भावात आता घसरण पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर गगनाला भिडलेले असताना अनेकांचं टेन्शन वाढलं तर काहींना घामच फुटला. अशात त्यांना ही बातमी वाचून थोडा दिलासा मिळेल. बुलियन मार्केट (Bullions Markert) या वेबसाइटवरील नवीन अपडेटनुसार, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. (Gold Silver price today is a golden opportunity to buy gold what is the price of 24 carat 10 gram gold)

कितीने घसरले सोन्या-चांदीचे भाव?

आज 29 एप्रिल 2024 रोजी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 71, 550 रूपये आहे. तर काल (28 एप्रिल) ही किंमत 72, 950 रूपये प्रति 10 ग्रॅम होती. त्याचबरोबर जर आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत पाहायची झाली तर ती 65, 468 रूपये आहे.  

हेही वाचा : BJP Lok Sabha Election : भाजपने महाराष्ट्रातील 'या' 7 खासदारांची कापली तिकिटं

तसंच, चांदीची किंमत आज 82, 500 रूपये प्रति किलोने आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 81, 160 रूपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती देशभरात बदलतात. एका बाजूला देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीचे दर वाढत आहेत, तसंच दुसऱ्या बाजूलाही म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. या दरम्यान, अक्षय तृतीयेचा सण जवळ आला आहे. यामुळे सोन्याच्या दरात झालेली घसरण सर्वसामान्यांच्या फायद्याची ठरत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : BJP : "तुम्ही कितीही थापा मारल्या तरी...", भाजपचा ठाकरेंवर पलटवार

भारतातील प्रमुख शहरांमधील सोन्या-चांदीच्या किंमती

  • मुंबईत 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 65, 468 रूपये आहे.
  • तर, 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 71, 320 रूपये, चांदी 82,130 रुपये प्रति किलो
  • दिल्ली -  24 कॅरेट सोने - 71, 250 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी 82,010 रुपये प्रति किलो 
  • पुणे- 24 कॅरेट सोने - 71, 370 रुपये प्रति 10 ग्रॅम,  चांदी 82,150 रुपये प्रति किलो
  • कल्याण- 24 कॅरेट सोने - 71, 370 रुपये प्रति 10 ग्रॅम,  चांदी 82,150 रुपये प्रति किलो 
  • ठाणे- 24 कॅरेट सोने - 71, 370 रुपये प्रति 10 ग्रॅम,  चांदी 82, 150 रुपये प्रति किलो
  • नागपूर - 24 कॅरेट सोने - 71, 370 रुपये प्रति 10 ग्रॅम,  चांदी 82, 150 रुपये प्रति किलो
  • सोलापूर- 24 कॅरेट सोने - 71, 400 रुपये प्रति 10 ग्रॅम,  चांदी 82, 180 रुपये प्रति किलो

    follow whatsapp

    ADVERTISEMENT