"दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न..." नाराज वडिलांनीच राधिकाची केली हत्या; नवीन अपडेट आली समोर!
गुरुग्राममधील राधिका यादव हत्याप्रकरणात आरोपी दीपक यांच्या शेजाऱ्यांकडून एक नवी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. राधिकाला दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न करण्याची इच्छा होती मात्र, तिच्या वडिलांचा याला पूर्णपणे नकार असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

राधिका यादव हत्याप्रकरणातील नवी अपडेट

राधिकाला दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करायचं होतं...

राधिकाच्या यादवच्या हत्येमागे जातीभेदाचं कारण?
Radhika Yadav Murder Update: गुरुग्राममधील राधिका यादव हत्याप्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरत असून याबद्दल बरेच धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. राधिकाची हत्या तिच्या वडिलांनी रागाच्या भरात केली नसून त्यामागे योग्य प्लॅनिंग असल्याचं पोलिसांनी खुलासा केला आहे. राधिकाची हत्या तिच्या वडिलांनीच केली असून ते आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांच्याविरोधात आता कारवाई केली जात आहे. दरम्यान, आरोपी दीपक यांच्या शेजाऱ्यांकडून एक नवी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. राधिकाला दुसऱ्या जातीतील मुलासोबत लग्न करण्याची इच्छा होती मात्र, तिच्या वडिलांचा याला पूर्णपणे नकार असल्याचं समोर आलं आहे.
दीपकच्या शेजाऱ्याने दिली माहिती
वजीराबाद येथे आरोपी दीपकचं मूळ गाव असून तिथल्या एका जुन्या शेजाऱ्याने या प्रकरणाबद्दल नवी माहिती दिली आहे. राधिका एका दुसऱ्या जातीतील मुलावर खूप प्रेम करत असून तिला त्याच मुलासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, राधिकाने निवडलेल्या साथीदारामुळे तिचे वडील नाराज होते. तो मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने राधिकाचे वडील, दीपक यादव यांना या लग्नाला पूर्णपणे नकार होता.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाचा वाद टोकाला पोहचला? अभिनेत्रीच्या पतीनेच पेपर स्प्रे मारून केले चाकूने वार अन्...
लग्नाबाबत राधिकाच्या निर्णयाला वडिलांचा विरोध
शेजाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, राधिकाचे वडील जुन्या विचारांचे असल्यामुळे त्यांना हे लग्न मान्य नव्हतं. राधिकाने आपल्याच जातीतील मुलाशी लग्न करावे, अशी दीपकची इच्छा होती. त्यामुळे राधिकाच्या लग्नाबाबतीत तिच्या या निर्णयावरून राधिका आणि तिच्या वडिलांमध्ये झालेल्या वादामुळे राधिकाची हत्या झाली असून टेनिस अकादमीचा वाद केवळ एक बहाणा असू शकतो, असं शेजाऱ्याने व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा: “मला कुटुंबापासून दूर जायचंय...” राधिकाची व्हॉट्सअॅप चॅट आली समोर! कोचला नेमकं काय सांगितलं?
हत्याप्रकरणाला वेगळंच वळण
पोलिसांनी आरोपी दीपकची चौकशी केली असता, तो लोकांच्या टोमण्यांना वैतागला होता. राधिकाच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, 'तू मुलीच्या पैशांवर जगत आहेस', असे लोक टोमणे मारायचे. तसेच मुलगी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावते असं देखील लोक तिच्या वडिलांना म्हणायचे. गुरुवारी राधिकाच्या वडिलांनी तिला अॅकॅडमीत जाण्यास नकार दिला आणि याच गोष्टीमुळे त्यांच्यात मोठा वाद झाला. या वादामुळे तिच्या वडिलांनी तिचा गोळ्या झाडून खून केला असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, या प्रकरणात जातीभेदाचा मुद्दा समोर आल्याने पोलिसांच्या तपासाला वेगळीच दिशा मिळत आहे. या प्रकरणाबद्दल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिकाची हत्या होण्यापूर्वी बरेच आठवडे वडील आणि मुलीमध्ये अनेक वाद झाले होते, त्याची चौकशी सुरू आहे. तसेच, राधिकाच्या हत्येमागे केवळ आर्थिक वाद होता की जातीभेदामुळे हे पाऊल उचलले गेले, याचा तपास सुरू आहे.