Govt Job: मुंबईत सरकारी नोकरीसाठी बंपर भरती; 'या' मोठ्या पदांसाठी करा अर्ज...
राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड मुंबई (RCFL) कडून टेक्निकल आणि वैद्यकीय पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. या भरतीअंतर्गत एकूण 74 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मुंबईत सरकारी नोकरीसाठी बंपर भरती

RCFL कडून मोठ्या पदांसाठी भरती जाहीर
RCFL Recruitment: सरकारी नोकरीच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणांसाठी मुंबईत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टिलाइजर्स लिमिटेड मुंबई (RCFL) कडून टेक्निकल आणि वैद्यकीय पदांसाठी भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे.
कधीपर्यंत कराल अर्ज?
या भरतीअंतर्गत एकूण 74 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 25 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. उमेदवारांचे अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातूनच स्विकारले जातील. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना RCFL च्या rcfltd.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
'या' पदांसाठी निघाली भरती
या भरतीमध्ये ऑपरेटर (केमिकल ट्रेनी), जूनिअर फायरमॅन ग्रेड-III आणि नर्स ग्रेड-II यांसारख्या महत्त्वपूर्ण पदांचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आणि संबंधित क्षेत्रात अनुभव किंवा डिप्लोमा प्राप्त केलेला असणे अनिवार्य आहे.
हे ही वाचा: "दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न..." नाराज वडिलांनीच राधिकाची केली हत्या; नवीन अपडेट आली समोर!
शैक्षणिक पात्रता
ऑपरेटर पदासाठी उमेदवाराकडे बीएससी (रसायनशास्त्र) पदवी किंवा केमिकल इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी क्षेत्रात तीन वर्षांचा डिप्लोमा असावा. फायरमॅन पदासाठी दहावी उत्तीर्ण आणि त्यासोबतच अग्निशमन प्रशिक्षण केंद्राचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. तसेच, नर्स पदासाठी जनरल नर्सिंगमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. इतर काही टेक्निकल पदांसाठी बीएससी (भौतिकशास्त्र) आणि मेकॅनिकल किंवा अभियांत्रिकीमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा असणं गरजेचं आहे.
वयोमर्यादा
ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 33 वर्षे आणि एससी (SC)/एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वय 35 वर्षे निश्चित करण्यात आलं आहे. वयाची गणना सरकारी नियमांनुसार केली जाईल आणि आरक्षण धोरणानुसार सवलत देखील दिली जाईल.
हे ही वाचा: अनैतिक संबंधाचा वाद टोकाला पोहचला? अभिनेत्रीच्या पतीनेच पेपर स्प्रे मारून केले चाकूने वार अन्...
वेतन
या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,000 ते 60,000 रुपयांपर्यंत पगार मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांचं वेतन पद आणि पात्रतेनुसार ठरवलं जाईल. हे वेतनश्रेणी इतर सरकारी भत्ते आणि सुविधांसह उपलब्ध असेल.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या म्हणजेच स्किल टेस्टच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा दोन भागात आयोजित करण्यात येईल. पहिल्या भागात विषयाशी संबंधित प्रश्न असतील आणि दुसऱ्या भागात अॅप्टिट्यूड म्हणजेच सामान्य क्षमतेशी संबंधित प्रश्न असतील.