UPSC CSE: महाराष्ट्रातून 'एवढ्या' जणांनी मारली यूपीएससीमध्ये बाजी, पाहा निकालाची संपूर्ण यादी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज (6 मार्च) नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. अनुज अग्निहोत्रीने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले. याशिवाय महाराष्ट्रातून किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले याची यादी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

ADVERTISEMENT

MumbaiTak
Google CTA

नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. अनुज अग्निहोत्रीने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. मुलाखत फेरीत पोहोचलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट देऊन त्यांचे निकाल तपासू शकतात. यावेळी आयोगाने 958 उमेदवारांची निवड केली. तर महाराष्ट्रातील 59 जणांनी यंदा घवघवीत यश मिळवलं आहे. 

कोण आहेत टॉपर्स?

या वर्षी, अनुज अग्निहोत्री याने नागरी सेवा परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला, त्यानंतर राजेश्वरी सुवे दुसऱ्या क्रमांकावर, आकांक्षा तिसऱ्या क्रमांकावर, राघव झुनझुनवाला चौथ्या क्रमांकावर आणि इशान भटनागर पाचव्या क्रमांकावर आहे.

महाराष्ट्रातील टॉपर कोण?

तर महाराष्ट्रात हृषीकेश आलासे (Rank 61), आकाश त्रिवेदी (Rank 73), गौरव चोप्रा  (Rank 83),  सायली पगार ( Rank 87), दीक्षा पाटकर (Rank 88), हे टॉपर्स आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील एकूण 59 जण यंदा UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

हे ही वाचा>> मेंढ्या चरायला नेल्या तेव्हाच फोन आला अन्... UPSC मध्ये यश मिळवलेला मेंढपाळ कुटुंबातील बिरदेव डोणे कोण?

958 उमेदवारांची निवड

यावेळी परीक्षेत बसलेल्या 958 उमेदवारांपैकी 317 सामान्य श्रेणीतील, 104 आर्थिकदृष्ट्या कमकुवत प्रवर्गातील, 330 ओबीसी प्रवर्गातील, 158 एससी प्रवर्गातील आणि 73 एसटी प्रवर्गातील होते. निकाल जाहीर होताच टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली. उमेदवार पीडीएफमध्ये त्यांची नावे आणि रोल नंबर तपासू शकतात. यूपीएससी परीक्षेने एकूण 958 पदांसाठी भरतीची घोषणा केली. ही परीक्षा 22 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2025 दरम्यान घेण्यात आली आणि 26 फेब्रुवारी 2026 रोजी मुलाखती पूर्ण झाल्या.

भारतात पहिला आलेला अनुज अग्निहोत्री आहे तरी कोण?

अनुज अग्निहोत्री हा यूपीएससी नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये टॉपर आहे. तो राजस्थानमधील एका लहानशा गावातील राउतभाटा येथील आहे. त्याने परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हे ही वाचा>> महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेला बिरदेव डोणेची UPSC मार्कशीट पाहिली का?, मिळाले 'एवढे' Marks

निकाल कसा पाहाल?

निकाल तपासण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in ला भेट द्या.

होमपेजवरील निकाल विभागात क्लिक करा.
नंतर नागरी सेवा (मुख्य/अंतिम) परीक्षा, [वर्ष] निकालासाठी लिंकवर क्लिक करा.
निकाल पीडीएफ स्वरूपात उघडेल. त्यानंतर, तुमचा रोल नंबर किंवा नाव शोधण्यासाठी पीडीएफमधील सर्च फंक्शन वापरा.

पाहा UPSC चा संपूर्ण निकाल पाहाण्यासाठी क्लिक करा >> View PDF 

UPSC परीक्षेत महाराष्ट्रातून उत्तीर्ण झालेले परीक्षार्थी

  1. हृषिकेश आलासे - Rank 61
  2. आकाश त्रिवेदी - Rank 73
  3. गौरव चोप्रा - Rank 83
  4. सायली पगार - Rank 87
  5. दीक्षा पाटकर - Rank 88
  6. ऋतुजा गायकवाड - Rank 106
  7. वरुण टोकस - Rank 117
  8. अंकिता अनिल पाटील - Rank 140 
  9. आर्यन सिरसीकर - Rank 175
  10. कार्तिक बच्छाव - Rank 177
  11. राहुल पाटील - Rank 224
  12. शुभम शरद बेहेरे - Rank 226
  13. ऋषिकेश पालिमकर - Rank 283
  14. मोहिनी जगताप - Rank 323
  15. अभिषेक ओझार्डे - Rank 336
  16. हर्षवर्धन पाटील - Rank 349
  17. हर्षवर्धन तिडके - Rank 355
  18. कुणाल अहिरराव - Rank 430
  19. अभिषेक मगदूम - Rank 449
  20. धनश्री अहिरे - Rank 489
  21. मनोज पाटील - Rank 493
  22. विशाखा कदम - Rank 504
  23. नंदिनी पाटील - Rank 512
  24. रजत वाळके - Rank 514
  25. निखिल तांबे - Rank 517
  26. श्रुती चव्हाण - Rank 527
  27. धनंजय दिघे - Rank 529
  28. संकेत कुंभार - Rank 539
  29. साईराज पाटील - Rank 545
  30. आरुषा पाटील - Rank 553
  31. पारस मिस्त्री - Rank 555
  32. बापूसाहेब गायकवाड - Rank 561
  33. प्रवीण कोळपे - Rank 584
  34. अविष्कार डेर्ले - Rank 591
  35. रोहित माळवेकर - Rank 601
  36. अभिषेक टेकाडे - Rank 610
  37. सिद्धार्थ तागड - Rank 619
  38. भाग्यश्री नायकेले - Rank 647
  39. शिवम वखारे - Rank 651
  40. पांडुरंग कांबळी - Rank 660
  41. अश्विनी कोळेकर - Rank 675
  42. प्रज्वल नासरे - Rank 677
  43. अल्पेश ढवळे - Rank 687
  44. सूरज सूर्यवंशी - Rank 702
  45. रामेश्वर शिंदे - Rank 705
  46. बसवराज पाटील - Rank 739
  47. प्रीतकुमार भाले - Rank 742
  48. राजश्री देशमुख - Rank 754
  49. चेतन ठाकरे - Rank 762
  50. प्रांजली मेश्राम - Rank 767
  51. मनीष झेंडे - Rank 788
  52. प्रथमेश शिंदे - Rank 817
  53. राहुल चांडोलकर - Rank 831
  54. हेमकृष्ण पिसाडे - Rank 849
  55. अतुल राजुरकर - Rank 863
  56. रोहित सांगळे - Rank 865
  57. सुरेश बोरकर - Rank 912
  58. प्रेरणा खवले - Rank 913
  59. अनिकेत अहिरे - Rank 941