T Natrajan: वडील मजूर पण मानली नाही हार, आता बुमराहला पछाडत मिळवला पर्पल कॅपचा मान!
IPL 2024 Purple Cap : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज 'टी नटराजन' सध्या फॉर्ममध्ये आहे. मैदानात अतिशय शांत दिसणाऱ्या या खेळाडूने आपल्या तुफानी खेळीने इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्पल कॅप जिंकली आहे. टी नटराजनने पर्पल कॅप मिळवण्याच्या शर्यतीत अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही पछाडलं आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
नेट बॉलर बनून क्रिकेट विश्वात केलं होतं पदार्पण
मजूरी करणाऱ्याच्या लेकाने घेतली आभाळात झेप
आयपीएलमध्ये आतापर्यंत पर्पल कॅप जिंकलेल्या खेळाडूंची यादी
IPL 2024 Purple Cap : सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज 'टी नटराजन' सध्या फॉर्ममध्ये आहे. मैदानात अतिशय शांत दिसणाऱ्या या खेळाडूने आपल्या तुफानी खेळीने इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये पर्पल कॅप जिंकली आहे. टी नटराजनने पर्पल कॅप मिळवण्याच्या शर्यतीत अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही पछाडलं आहे.
ADVERTISEMENT
आयपीएल 2024 चा हा 50वा सामना हैदराबादमध्ये 2 मे रोजी खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने शेवटच्या बॉलवर राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. हैदराबादच्या या विजयाचा खरा हिरो भुवनेश्वर कुमार होता, ज्याने शेवटच्या बॉलवर रोव्हमन पॉवेलला एलबीविंग करून विजय मिळवून दिला.
सनरायझर्स हैदराबादसाठी टी नटराजननेही शानदार गोलंदाजी केली आणि 4 षटकात 35 धावा करत 2 बळी घेतले. यासह नटराजन सध्या या आयपीएलमध्ये सर्वाधिक 15 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. नटराजनने 8 सामन्यात 19.13 च्या एव्हरेजने आणि 8.96 च्या इकॉनॉमी रेटने या विकेट घेतल्या आहेत.
हे वाचलं का?
हेही वाचा : स्मृती इराणींविरोधात 'निष्ठावंता'ला तिकीट, काँग्रेसचे केएल शर्मा कोण?
नटराजननंतर जसप्रीत बुमराह (14 विकेट), मुस्तफिजुर रहमान (14 विकेट) अशा क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर हर्षल पटेल, मथिशा पाथिराना, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जेराल्ड कोएत्झी, मुकेश कुमार यांच्या नावावर 13 विकेट्स आहेत.
नेट बॉलर बनून क्रिकेट विश्वात केलं होतं पदार्पण
33 वर्षीय नटराजनने 2020-21 च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतासाठी पदार्पण केले. 'यॉर्कर मॅन' म्हणून आपली छाप सोडलेल्या नटराजनने ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. ऑस्ट्रेलियासोबत मर्यादित षटकांच्या सीरिजमध्ये खेळलेल्या नटराजनला नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियात आणण्यात आले, पण नशिबाने त्याला साथ दिली आणि त्याच्यासाठी नवीन दरवाजे उघडत राहिले.
ADVERTISEMENT
हेही वाचा : माझ्यावर बाळासाहेबांचं कर्ज, ते मी कधीही..: PM मोदी
त्यावेळी रवी शास्त्रींनी त्यांची खूप प्रशंसा केली होती आणि त्याला डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट देखील म्हटलं होतं. आयपीएल 2022 च्या लिलावात नटराजनला सनरायझर्स संघाने 4 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
ADVERTISEMENT
मजूरी करणाऱ्याच्या लेकाने घेतली आभाळात झेप
टी नटराजनचं पूर्ण नाव थांगारासू नटराजन असं आहे. तो मिळून एकूण 5 भावंडं आहेत. नटराजनचे वडील एका साडी उत्पादन युनिटमध्ये रोजंदारी मजूर म्हणून काम करायचे, तर त्याची आई रस्त्याच्या कडेला स्टॉल चालवायची. अशा आव्हानात्मक परिस्थितीत नटराजन आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यांना शिक्षणासाठी वही, पेन्सिल यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठीही संघर्ष करावा लागला.
टेनिस बॉलने सुरू केला क्रिकेट प्रवास
या आव्हानांना न जुमानता नटराजन याचा क्रिकेट प्रवास वयाच्या 20 व्या वर्षापर्यंत टेनिस बॉलने क्रिकेट खेळून सुरू झाला. 2011 मध्ये त्याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला जेव्हा तो जयप्रकाशला भेटला, जो त्याचे गुरू आणि मार्गदर्शक बनला. नटराजनची क्षमता ओळखून, त्याने त्याला चेन्नईतील TNCA चौथ्या विभागात क्रिकेटमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्याच्या गुरूंच्या सन्मानार्थ, नटराजन याने आयपीएल 2020 दरम्यान 'जेपी नट्टू' नावाचा शर्ट परिधान केला होता. नटराजनचे व्यावसायिक क्रिकेटमध्ये पदार्पण 2015 मध्ये झाले जेव्हा त्याने पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला.
आयपीएल पर्पल कॅप कोणाला मिळते?
पर्पल कॅप ही इंडियन प्रीमियर लीगच्या सीझनमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूला दिली जाते. पर्पल कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला त्या सीझनध्ये सर्वोत्तम गोलंदाज म्हणूनही ओळखलं जातं. संपूर्ण सीझनध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप आणि 15 लाख रुपयांची ट्रॉफी दिली जाते. ड्वेन ब्राव्होने 2013 आणि 2015 अशी दोनदा पर्पल कॅप जिंकली आहे. तर, भुवनेश्वर कुमारनेही 2016 आणि 2017 मध्ये हा पुरस्कार जिंकला आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत पर्पल कॅप जिंकलेल्या खेळाडूंची यादी
-
2008 सोहेल तन्वीर (राजस्थान रॉयल्स) 22
-
2009 आरपी सिंग (डेक्कन चार्जर्स) 23
- 2010 प्रज्ञान ओझा (डेक्कन चार्जर्स) 21
- 2011 लसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स) 28
- 2012 मोर्ने मॉर्केल (दिल्ली कॅपिटल्स) 25
- 2013 ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्स) 32
- 2014 मोहित शर्मा (चेन्नई सुपर किंग्ज) 23
- 2015 ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्स) 26
- 2016 भुवनेश्वर कुमार (सनराईजर्स हैदराबाद) 23
- 2017 भुवनेश्वर कुमार (सनराईजर्स हैदराबाद) 26
- 2018 अँड्र्यू टाय (पंजाब किंग्स) 24
- 2019 इम्रान ताहिर (चेन्नई सुपर किंग्स) 26
- 2020 कागिसो रबाडा (दिल्ली कॅपिटल्स) 30
- 2021 हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर) 32
- 2022 युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स) 27
- 2023 मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स) 28
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT