6 फुट 8 इंच उंची, भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले; Zimbabwe चा 'हा' तगडा गोलंदाज आहे तरी कोण?

मुंबई तक

Zimbabwe beats Australia : आयसीसी मेन्स टी-20 विश्वचषक 2026मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. कोलंबोतील मैदानावर रंगलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंजादी करताना ऑस्ट्रेलियासमोर 170 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 146 धावांमध्येच गारद झाला. झिम्बाब्वेच्या या अविश्वसनीय विजयाचा शिलेदार ठरला वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी. मुझारबानीने आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन संघाचे कंबरडेच मोडले. त्याने 4 षटकांत 17 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर घोषित कर ण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारा मुझारबानी नक्की कोण आहे, जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

Blessing Muzarabani
Blessing Muzarabani
social share
google news

बातम्या हायलाइट

point

6 फुट 8 इंच उंची, भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले

point

Zimbabwe चा 'हा' तगडा गोलंदाज आहे तरी कोण?

Zimbabwe beats Australia : आयसीसी मेन्स टी-20 विश्वचषक 2026मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. कोलंबोतील मैदानावर रंगलेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंजादी करताना ऑस्ट्रेलियासमोर 170 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 146 धावांमध्येच गारद झाला. झिम्बाब्वेच्या या अविश्वसनीय विजयाचा शिलेदार ठरला वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुझारबानी. मुझारबानीने आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलियन संघाचे कंबरडेच मोडले. त्याने 4 षटकांत 17 धावा देत 4 बळी घेतले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर घोषित कर ण्यात आले. ऑस्ट्रेलियाच्या धडाकेबाज फलंदाजांना सळो की पळो करुन सोडणारा मुझारबानी नक्की कोण आहे, जाणून घेऊया.

हे ही वाचा : पीएम मोदी अन् अमित शाहांना टॅग करत रोहित पवारांची पोस्ट, अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणात मोठी मागणी

ऑस्ट्रेलियन फलंदाजाना स्थिरावण्याची संधीच नाही

झिम्बाब्वेच्या गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. विशेषत: मुझारबानीने फलंदाजांना क्रीजवर टिकूच दिले नाही. अचूक लाईन आणि लेंग्थ यासोबतच वेगवान गतीच्या सहाय्याने त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जेरीस आणले. त्याने जोश इंग्लिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू रेनशॉ आणि अॅडम झॅम्पा यांच्या विकेट घेतल्या. ही त्याच्या टी-20 कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

मुझारबानीची कारकीर्द 

ब्लेसिंग मुझारबानी या 6 फूट 7 इंच उंचीच्या गोलंदाजाला बघून अनेक फलंदाजांना धडकी भरते. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या 29 वर्षीय मुझारबानीची कारकीर्द उत्तम राहिली आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने त्याला 75 लाख रुपयांमध्ये त्याला करारबद्ध केले होते. मुझारबानीला जगभरातील विविध टी-20 लीग्समध्ये खेळण्याचा अनुभव आहे. डिसेंबर 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मुझारबानीने झिम्बाब्वेसाठी 18 कसोटी, 57 एकदिवसीय आणि 85 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 26.20 च्या सरासरीने 67 बळी घेतले आहेत; तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 33.35 च्या सरासरीने 70 बळी घेतले आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 21.08 च्या सरासरीने आणि 7.10 च्या इकॉनॉमी रेटने 100 बळी घेतले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp