Amethi Lok Sabha : स्मृती इराणींविरोधात 'निष्ठावंता'ला तिकीट, काँग्रेसचे केएल शर्मा कोण?

भागवत हिरेकर

Who Is Kishori Lal Sharma : स्मृती इराणी यांच्याविरोधात काँग्रेसने यावेळी किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

ADVERTISEMENT

भाजपच्या उमेदवार स्मती इराणी, तर सोनिया गांधी प्रियांका गांधींसोबत केएल शर्मा.
अमेठी लोकसभा मतदारसंघात किशोरी लाल शर्मा विरुद्ध स्मृती इराणी लढत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अमेठी लोकसभा निवडणूक २०२४

point

काँग्रेसने किशोरी लाल शर्मांना दिली उमेदवारी

point

केएल शर्मा विरुद्ध स्मृती इराणी यांच्यात लढत

Kishori Lal Sharma Amethi Lok Sabha Election : अमेठी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असलेल्या किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसला बालेकिल्ला अशी अमेठीची ओळख आहे. पण, २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. यावेळी कोण, असा प्रश्न चर्चेत होता. अखेर काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी किशोरी लाल शर्मा यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे ते कोण आहेत, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. 

हे तेच केएल शर्मा आहेत, जे गांधी कुटुंबाच्या अनुपस्थितीत अमेठी आणि रायबरेलीमध्ये काम पाहतात. या लोकसभा मतदारसंघामध्ये शर्मा यांना गांधी कुटुंबाचा प्रतिनिधी म्हणून ओळखलं जातं. 

किशोरी लाल शर्मा यांच्याबद्दल...

काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल शर्मा हे मूळचे आहेत पंजाबमधील लुधियानाचे. 1983 मध्ये केएल शर्मा यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. १९९१ मध्ये राजीव गांधी यांचे निधन झाले. त्यानंतर केएल शर्मा हे गांधी कुटुंबाच्या जवळ येत गेले. अमेठी आणि रायबरेलीमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. 

अमेठी आणि गांधी कुटुंब

काही अपवाद सोडले तर अमेठीतून नेहमी गांधी कुटुंबातील व्यक्तीच जिंकली आहे. १९६७ आणि १९७१ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विद्याधर वाजपेयी यांचा विजय मिळाला होता. त्यानंतर १९७७ मध्ये जनता पक्षाच्या रवींद्र प्रताप सिंह यांचा विजय झाला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp