Pune Viral Video : जॉब सोडला.. शेवटच्या दिवशी ऑफिससमोर ढोल लावून नाच नाच नाचला...
Pune Man Quits Toxic Job : बरेच कर्मचारी नोकरीत नाखुष असतात. चांगला पगार नसणे, चांगली वागणुक नसणे, अशी सगळी या मागची कारणे असतात. मात्र तरी देखील अनेक कर्मचारी काम करत असतात. पण पुण्यातील एका कर्मचाऱ्याने अशाच टॉक्सिक नोकरीला कंटाळून कामाच्या शेवटच्या दिवशी जे केले आहे, ते पाहून सह कर्मचाऱ्यांसह बॉस देखीस आश्चर्यचकीत झाला आहे.
ADVERTISEMENT
Pune Man Quits Toxic Job : नोकरी सोडण्याचा सध्या ट्रेंडच आला आहे. जो तो उठसूट नोकरी सोडत (Toxic Job) चालला आहे. इतकंच नाही तर अनेक कर्मचारी नोकरी सोडून कंपनीतच फेरवलचे मजेशीर व्हिडिओ देखील बनवत चालले आहेत. असाच एक फेरवलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एका तरूणाने नोकरी सोडण्याच्या आनंदात कंपनीत ढोल ताशा बोलावून आनंद साजरा केला आहे. विशेष म्हणजे तरूण इतक्यावरच थांबला नाही तर त्याने बॉसच्याच समोर भन्नाट डान्स देखील केला आहे. हा त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिआवर प्रचंड चर्चेत आहे. (pune man quits toxic job play dhol tasha office premises front of his manager viral video)
ADVERTISEMENT
बरेच कर्मचारी नोकरीत नाखुष असतात. चांगला पगार नसणे, चांगली वागणुक नसणे, अशी सगळी या मागची कारणे असतात. मात्र तरी देखील अनेक कर्मचारी काम करत असतात. पण पुण्यातील एका कर्मचाऱ्याने अशाच टॉक्सिक नोकरीला कंटाळून कामाच्या शेवटच्या दिवशी जे केले आहे, ते पाहून सह कर्मचाऱ्यांसह बॉस देखीस आश्चर्यचकीत झाला आहे. या संदर्भातला त्याने व्हिडिओ देखील शेअर केला आहे.
हे ही वाचा : पुन्हा 'सूरत पॅटर्न'! काँग्रेसची आणखी एक जागा गेली, उमेदवारानेच केला मोठा 'गेम'
व्हायरल व्हिडिओत काय?
पुण्याचा अनिकेत नावाचा एक तरूण गेल्या तीन वर्षापासून एका कंपनीत सेल्स असोसिएट म्हणून काम करत होता. या कंपनीत काम करत
असताना त्याची एकदाही पगारवाढ झाली नव्हती. त्यामुळे तो निराश असल्याची माहिती होती. अखेर कंपनी पगारवाढ देत नसल्याने अनिकेतने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्याने कंपनीत राजीनामा टाकला होता. शेवटच्या दिवशी त्याचे सहकर्मचारी त्याचं फेरवल करणार होते. याच दिवशी अनिकेतने कंपनी बाहेर ढोलपथक मागवून नोकरी सोडण्याचा आनंद व्यक्त केला होता. यावेळी ढोल ताशाच्या तालावर अनिकेत नाचला देखील होता. विशेष म्हणजे यावेळी त्याचा मॅनेजरही त्या ठिकाणी उपस्थित होता.
हे वाचलं का?
अनिकेतच्या मित्राने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनला त्याच्या मित्राने लिहले की, मला वाटते की बरेच लोक याच्याशी संबंधित असतील. आजकाल टॉक्सिक वर्क कल्चर सर्वत्र दिसून येत आहे. तिथे आदर नसणे आणि हक्क नसणे सामान्य आहे. अनिकेत त्याच्या आयुष्यातील पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे. मला आशा आहे की, अनिकेतची गोष्ट अनेकांना प्रेरणा देईल.
हे ही वाचा : Nashik Lok Sabha : हेमंत गोडसेंचा पत्ता कट?; शांतिगिरी महाराजांनी भरला अर्ज
अनिकेतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर अनेक कर्मचारी भन्नाट कमेंट करत आहेत. अनेक कर्मचारी आपला अनुभवही सांगत आहेत.सध्या या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT