Video: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर डोळ्यासमोर कोसळलं, नेमकं काय घडलं?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शिवसेनेच्या (UBT) स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांच्यावर आलेलं मोठं संकट टळलं

point

सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड येथे पोहोचलेले हेलिकॉप्टर लँडिंग करताना कोसळलं

point

सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आम्ही सुखरुप- सुषमा अंधारे

Sushma Andhare Helicopter Crash : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रचारादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवसेनेच्या (UBT) स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांच्यावर आलेलं मोठं संकट आता टळलं आहे. त्या हेलिकॉप्टर अपघातातून थोडक्यात बचावल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड येथे पोहोचलेले हेलिकॉप्टर लँडिंग करताना कोसळलं. या अपघातात सुषमा अंधारे आणि पायलट सुखरूप आहेत. तांत्रिक कारणामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. त्या हेलिकॉप्टरमध्ये बसण्यापूर्वीच ते क्रॅश झाले. (Helicopter that came to pick up Sushma Andhare at raigad mahad crashed in front of her eyes what really happened)

ADVERTISEMENT

सुषमा अंधारे यांना याच हेलिकॉप्टरमधून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. त्यांनी स्वत: फेसबुकवर हेलिकॉप्टर लँडिंगचा हा धक्कादायक व्हिडीओ शेअर करून अपघाताची माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांची महाड, रायगडमध्ये आज (2 मे) बैठक झाली होती. अंधारे यांना हेलिकॉप्टरने दुसऱ्या ठिकाणी जायचे होते. त्यासाठी त्यांना घ्यायला हेलिकॉप्टर आले होते. 

हेही वाचा: स्मृती इराणींविरोधात 'निष्ठावंता'ला तिकीट, काँग्रेसचे केएल शर्मा कोण?

या घटनेचा व्हिडिओ लाइव्ह रेकॉर्ड करण्यात आला आहे. रायगडमध्ये 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. पक्षाचे उमेदवार अनंत गीते यांच्या समर्थनार्थ सभा घेण्यासाठी सुषमा अंधारे आल्या होत्या. यावेळी ही घटना घडली. 

हे वाचलं का?

 

हेही वाचा: IPL 2024: बुमराहला पछाडून पर्पल कॅप मिळवणारा SRH चा तो क्रिकेटपटू कोण?

घटनेनंतर हेलिकॉप्टर लँडिंग करताना हा अपघात कसा झाला? त्याची पडताळणी केली जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (UBT) महाराष्ट्रात 21 जागांवर लोकसभा निवडणूक लढवत आहे.

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आम्ही सुखरुप- सुषमा अंधारे

अपघातानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांना माहिती देत सांगितले की, 'एका दिवसांत दोन, तीन सभा घ्याव्या लागत आहेत. महाडमधील सभेनंतर बारामतीकडे जाण्यासाठी आम्ही हेलिपॅडवर आलो. कारमधून आम्ही खाली उतरलो होतो. त्यावेळी हेलिकॉप्टरने दोन, तीन घिरट्या मारल्या आणि आचानक हेलिकॉप्टर कोसळले. मी आणि विशाल गुप्ते या हेलिकॉप्टरने जाणार होतो. परंतु सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे आम्ही सर्व सुखरुप आहोत.'

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT