Lok Sabha Election 2024: 'माझ्यावर बाळासाहेबांचं कर्ज.. ते विसरू शकत नाही', PM मोदी असं का म्हणाले?
PM Modi on Balasaheb Thackeray: 'बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज विसरू शकत नाही..' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पण त्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय? याबाबत राजकीय वर्तुळात सध्या बरीच चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Lok Sabha Election 2024: मुंबई: 'बाळासाहेबांचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी ते कर्ज विसरू शकत नाही.. अजिबात विसरू शकत नाही.' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं. पण मोदींनी नेमकं हे विधान आता का केलं असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत. (lok sabha election 2024 why did pm modi say i can never forget balasaheb thackeray debt to me)
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य हे भाजपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना अत्यंत आक्रमक पद्धतीने भाजप आणि मोदींविरोधात प्रचार करत आहे. अशावेळी भाजपला फटका बसू नये याची काळजी आता पंतप्रधान मोदी स्वत: घेत आहेत. त्यामुळेच आपले ठाकरेंशी वैयक्तिक वाद नसल्याचं मोदींनी म्हटलंय आहे. तसंच बाळासाहेब ठाकरे यांचं आपल्यावर कर्ज असल्याचं म्हणत मोदींनी आता मतदारांच्या काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केला आहे.
पाहा पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले...
ज्या कालखंडात त्यांनी सरकार चालवलं.. त्यावेळचं सगळं काम हे भारताच्या राजकीय पक्षाच्या मूलभूत विचारधारा.. जी बाळासाहेबांची होती त्याच्या विपरित केलं आहे.
औरंगजेबाचं कौतुक करणाऱ्यांसोबत बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा बसतोय हा राग महाराष्ट्रातील लोकांमध्ये आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत जर कोणी बसत असेल तर लोकांना दिसतं की, बाळासाहेबांनी ते हे म्हटलं होतं.. त्यांच्या मुलांमध्ये सत्तालालसा अशी आलीए? त्यामुळे भावनिक बाजू आमच्या बाजूने आहे आणि राग त्यांच्या बाजूने आहे.