श्रवण दास महाराजाचा कारनामा! लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Bihar Crime News : बिहारच्या मिथिलांचलमध्ये धर्म आणि आस्थेच्या आड लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. येथील एका सुप्रसिद्ध कथा वाचकाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर ती मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपातही केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सुप्रसिद्ध कथावाचक बाबाचा कारनामा
लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
गर्भपातानंतरही थांबला नाही
Bihar Crime News : बिहारच्या मिथिलांचलमध्ये धर्म आणि आस्थेच्या आड लैंगिक अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आले आहे. येथील एका सुप्रसिद्ध कथा वाचकाने अल्पवयीन मुलीला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर ती मुलगी गर्भवती झाल्यानंतर तिचा गर्भपातही केला. मुलीने लग्नासाठी तगादा लावल्यानंतर कथावाचकाने एका बंद खोलीत लग्नही केले. मात्र हे लग्न सार्वजनिक करण्यास त्याने नकार दिल्यानंतर मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर या बाबाला अटक करण्यात आली आहे. श्रवण दास महाराज असं या कथावाचक बाबाचं नाव आहे.
हे ही वाचा : समलैंगिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढला, महिला प्रियकरासोबत कट रचला, 60 हजारांची सुपारी
लग्नाच्या अमिषाने शारिरीक संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, श्रवण दासचं त्या मुलीच्या घरी येणं-जाणं होतं. या दरम्यान दोघांची ओळख झाली आणि ते एकमेकांच्या जवळ आले. यानंतर महाराजाने मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासही सुरुवात केली. यातच ती मुलगी गर्भवती राहिली. मात्र गोड बोलून तिचा गर्भपात केला गेला. मुलीचं लग्नाचं वय झाल्यानंतर लग्न करण्याचं अमिष त्यानं तिला दाखवलं. मुलीने दबाव वाढवल्यानंतर एका बंद खोलीत त्याने तिच्याशी लग्न केलं. मात्र हे लग्न सार्वजनिक करण्यास त्याने नकार दिला. अनेकदा पंचायत होऊनही महाराजाने तिचा बायको म्हणून स्वीकार करण्यास नकार दिला.
लग्नाचा व्हिडिओ आला समोर
या प्रकरणी कथावाचक श्रवणदास आणि त्या अल्पवयीन मुलीचा एका खोलीत लग्न करत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत श्रवणदास त्या मुलीच्या कपाळावर सिंदूर लावताना स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर या प्रकरणाचं गांभीर्य वाढल्यानं पोलिसांनी तातडीची कारवाई केली आहे.










