डोंबिवलीतील प्रगती कॉलेज हादरले! शिपायाने चौथ्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन, प्राचार्यांच्या केबिनमध्ये काय घडलं?
Peon Suicide : डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरातील प्रगती कॉलेजमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या लायब्ररी शिपायाने कॉलेजच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, या घटनेमुळे कॉलेज परिसरासह डोंबिवली शहरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
डोंबिवलीतील प्रगती कॉलेज हादरले!
शिपायाने चौथ्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन
प्राचार्यांच्या केबिनममध्ये काय घडलं?
Peon Suicide : डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर परिसरातील प्रगती कॉलेजमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. कॉलेजमध्ये कार्यरत असलेल्या लायब्ररी शिपायाने कॉलेजच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे, या घटनेमुळे कॉलेज परिसरासह डोंबिवली शहरात खळबळ उडाली आहे. प्रवीण चौधरी (42) असे मृत शिपायाचे नाव असून ते ठाकुर्ली येथील खंबाळपाडा परिसरात राहत होते. ते गेल्या काही वर्षांपासून डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील प्रगती कॉलेजमध्ये लायब्ररी शिपाई म्हणून कार्यरत होते.
हे ही वाचा : औषध न घेतल्याने पेशंटची हत्या, वॉर्डबॉयसह चौघे ताब्यात; नेमकं काय घडलं?
प्राचार्यांच्या केबिनमध्ये काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास प्रवीण चौधरी हे आपल्या आई-वडिलांसह कॉलेजमध्ये प्राचार्यांशी काही कारणास्तव चर्चा करण्यासाठी आले होते. प्राचार्यांच्या कार्यालयात चर्चा सुरू असताना अचानक त्यांनी कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरील बाल्कनीकडे धाव घेतली आणि क्षणात खाली उडी घेतली. ही घटना इतक्या अचानक घडल्याने उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला.घटनेनंतर कॉलेज परिसरात खळबळ उडाली. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हे ही वाचा : नवरा बायको दोघंही दारु प्यायले, दिवसभर नशेत अन् संध्याकाळी मोठं कांड; मुलानं गाठलं पोलिस स्टेशन










