औषध न घेतल्याने पेशंटची हत्या, वॉर्डबॉयसह चौघे ताब्यात; नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Crime News : एका 32 वर्षीय रुग्णाने केवळ औषध घेण्यास नकार दिल्याने वॉर्ड बॉय आणि इतर तिघांनी मिळून या रुग्णाला मारहाण केली. या मारहाणीत रुग्णाचा जीव गेला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे.  

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

औषध न घेतल्याने पेशंटची हत्या

point

वॉर्डबॉयसह चौघे ताब्यात

point

नेमकं काय घडलं?

Crime News : एका रुग्णाने औषध न घेतल्याने त्याला मारहाण करुन त्याची हत्या करण्यात आली आहे. गुजरातच्या सुरतमधील एका नशामुक्ती केंद्रात ही घटना घडली. एका 32 वर्षीय रुग्णाने केवळ औषध घेण्यास नकार दिल्याने केंद्रातील  वॉर्ड बॉय आणि इतर तिघांनी मिळून या रुग्णाला मारहाण केली. या मारहाणीत रुग्णाचा जीव गेला. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली आहे.  

हे ही वाचा : तू जास्त मोठा झाला का? आत्ता तुला बघतो.. कल्याणमध्ये कुख्यात गुंड पीडीकडून रेल्वे कंत्राटदारावर जीवघेणा हल्ला

औषध घेण्यास नकार दिल्याने मारहाण

ही घटना सुरतच्या डुमास परिसरातील 'रीवा व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रात' घडली. धवल राठोड (32) असे मृत रुग्णाचे नाव असून त्याला 28 फेब्रुवारी रोजी उपचारासाठी या केंद्रात दाखल करण्यात आले होते. 1 मार्चच्या रात्री धवलने औषध घेण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यावरून केंद्रातील कर्मचाऱ्यांशी त्याचा वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत झाले आणि कर्मचाऱ्यांनी संतापून धवलला बेदम मारहाण केली. त्याची प्रकृती खालावल्याने त्याला 108 रुग्णवाहिकेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कर्मचारी आणि इतर रुग्णांची चौकशी

सहाय्यक पोलीस आयुक्त श्वेता डॅनियल यांनी दिलेल्या माहितीनुसार, धवलच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्याने पोलिसांनी संशय व्यक्त करत मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवला होता. या अहवालात धवलचा मृत्यू डोके, कंबर आणि शरीराच्या इतर भागांवर झालेल्या गंभीर जखमांमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी केंद्रातील इतर कर्मचारी आणि रुग्णांची सखोल चौकशी केली असता, औषध न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात कर्मचाऱ्यांनी त्याला लाठ्यांनी मारल्याचे उघड झाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp