नाक आणि जीभ कापून 62 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या, लैंगिक अत्याचाराचा संशय अखेर...
Crime News : एका 62 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येत वृद्ध महिलेचा छळ करण्यात आला. तिची जीभ आणि नाकावर वार करण्यात आले. संबंधित घटनेत क्रूरतेची परिसीमा पाहून पोलिसांनी डोकं धरलं. मृत महिलेचा मृतदेह गव्हाच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
रक्ताच्या थारोळ्यात वृद्ध महिलेचा मृतदेह
वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचाराचा संशय
Crime News : मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 62 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येत वृद्ध महिलेचा छळ करण्यात आला. तिची जीभ आणि नाकावर वार करण्यात आले. संबंधित घटनेत क्रूरतेची परिसिमा पाहून पोलिसांनी डोकं धरलं. मृत महिलेचा मृतदेह गव्हाच्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला होता. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं वृत्त आहे.
हे ही वाचा : सॉफ्टवेअर इंजिनिअरची बायको 'त्या' गोष्टीला वैतागाली, नको ते केलं अन्...
संबंधित घटना ही भोजपूर पोलीस ठाणे परिसरातील आहे. संबंधित वृद्ध महिला ही 30 वर्षांपासून तिच्या पतीसोबत गावापासून सुमारे एक किमी अंतरावर असलेल्या शेतातील झोपडीत राहत होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीच्या निधनानंतर ती तिच्या मुलांसह सुनेसोबत राहत होती. दरम्यान ही घटना मंगळवारी रात्री घडली तेव्हा महिलेचा मुलगा शेतात पाणी घालण्यासाठी गेला होता आणि तिची सून कामासाठी राजस्थानला गेली होती.
रक्ताच्या थारोळ्यात वृद्ध महिलेचा मृतदेह
बुधवारी सकाळी मुलगा परतला आणि आई झोपडीतून बेपत्ता होती, तेव्हा शोध सुरु करण्यात आला. वृद्ध महिला काही अंतरावर गव्हाच्या शेतात गंभीर जखमी झाली आणि रक्तस्त्राव झालेल्या अवस्थेत आढळून आली होती. रुग्णालयात दाखल करताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचाराचा संशय
घटनास्थळी आढळलेल्या काही वस्तूंवरून महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी अद्यापही याबाबत ठोस माहिती दिली नसल्याचे वृत्तमाध्यमाने सांगितलं. दरम्यान मृत व्यक्तीच्या शवविच्छेदनाचा अहवालाची वाट पाहिली जात आहे.










