होळीदिवशी मित्राला घरी जेवायला बोलावले, नंतर 17 वर्षीय तरुणावर चाकूने वार करत संपवलं
Crime News : गावात लोक धुलीवंदन सण साजरा करताना, होळीच्या दिवशी एका तरुणाने मित्राला जेवणासाठी आमंत्रित केले होते. नंतर मित्रांनी 17 वर्षीय मित्रावर चाकूने वार करत संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे आणि कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
होळीच्या दिवशी मित्राला जेवणाचे आमंत्रण
हल्लेखोरांकडून अमृतच्या छातीवर, मानेवर आणि कमरेवर वार केले
Crime News : उत्तर प्रदेशातील बागापकमध्ये एक खळबळजनक समोर आली. सिंघवली अहिर पोलीस ठाणे हद्दीत तितौडा गावात लोक धुलीवंदन सण साजरा करताना, होळीच्या दिवशी एका तरुणाने मित्राला जेवणासाठी आमंत्रित केले होते. नंतर मित्रांनी 17 वर्षीय मित्रावर चाकूने वार करत संपवलं. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे आणि कुटुंबात एकच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा : प्रेयसीने आपल्या साथीदारांच्या मदतीने प्रियकरावर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं, रुग्णालयात मृत्यू
होळीच्या दिवशी मित्राला जेवणाचे आमंत्रण
घडलेल्या घटनेनुसार, मृत अमृत हा बिनौली पोलीस स्टेशन परिसरातील बरवड गावाचा रहिवासी होता. कुटुंबातील सदस्यांचं म्हणणे आहे की, अमृतला त्याचा मित्र समीरने त्याच्या गावी, तित्रौडा येथे होळीच्या दिवशी जेवणाचे आमंत्रण दिले होते. समीरच्या निमंत्रणाला प्रतिसाद देत, अमृत त्याचे भाऊ सागर आणि मित्र कार्तिक आणि बॉबीसह तित्रौडा गावात आले होते.
हल्लेखोरांकडून अमृतच्या छातीवर, मानेवर आणि कमरेवर वार केले
समीर आणि त्याचे मित्र तित्रौडा गावात चिकन आणण्यासाठी गेले होते, अचानक त्यांच्यात वाद झाला, वाद इतका वाढला की समीर आणि त्याच्या मित्रांनी अमृतवर हल्ला केला. हल्लेखोरांनी अमृतच्या मानेवर, छातीवर आणि कमरेवर अनेकदा चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
अमृतचा दुर्दैवी मृत्यू
गंभीर जखमी झालेल्या अमृतचा जागीच मृत्यू झाला, तर आरोपी हा पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केला.










