शिक्षिकेने विद्यार्थ्याला काठीने मारले, 14 वर्षीय मुलाची दृष्टीच गेली, वडिलांनी सांगितला घटनाक्रम

मुंबई तक

Crime News : शिक्षिकेनं इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण केली. मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोळ्याला भयंकर इजा झाली. विद्यार्थी पेन पेन उचलत असताना, शिक्षिकेनं त्याला काठीने मारहाण केली. दोन महिने उपचार करूनही, मुलाची दृष्टी पुन्हा आली नाही. यामुळे आता संबंधित शाळेच्या व्यवस्थापनेवर आणि शिक्षक वृदांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मारहाणीत विद्यार्थ्याची दृष्टी गेली

point

डॉक्टरांनी मोतीबींदू झाल्याचं सांगितलं

point

वडिलांनी सांगितला घटनाक्रम

Crime News : शिक्षिकेनं इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण केली. मारहाणीत विद्यार्थ्याच्या डोळ्याला भयंकर इजा झाली. विद्यार्थी पेन पेन उचलत असताना, शिक्षिकेनं त्याला काठीने मारहाण केली. दोन महिने उपचार करूनही, मुलाची दृष्टी पुन्हा आली नाही. यामुळे आता संबंधित शाळेच्या व्यवस्थापनेवर आणि शिक्षक वृदांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  

हे ही वाचा : 41 वर्षीय मालकीणीवर लैंगिक अत्याचार, 'त्या' एका कारणाने तरुण घ्यायचा गैरफायदा, अखेर रंगेहाथ पकडले

मारहाणीत विद्यार्थ्याची दृष्टी गेली

पीडित विद्यार्थ्यांच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्याला सांगितले की, मुलाची दृष्टी गेली आहे. तो शाळा व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित करतो. पीडितेच्या तक्रारीवरून, शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळेच्या मालकाविरुद्ध वेव्ह सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

डॉक्टरांनी मोतीबींदू झाल्याचं सांगितलं

नववीत शिक्षण घेणाऱ्या पीडित विद्यार्थ्याचे वय 14 आहे. तो गिरधीलाला पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतो. 20 डिसेंबर रोजी तो शाळेत असताना वर्गात त्याचा पेन पडला आणि तो उचलण्यासाठी खाली वाकला. त्याचक्षणी, शिक्षिकेने त्याला काठीने मारले असता, त्याच्या डोळ्याला गंभीर जखम झाली. संबंधित प्रकरणात आरोप आहे की, काठीने मारताना डोळ्यावर फटका बसला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाला गावातील डॉक्टरकडे नेले आणि घरी सोडले. एका रुग्णालयात त्याच्यावर ऑपरेशन मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली, जिथे डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मोतीबिंदू झाल्याचं सांगितलं. 

हे ही वाचा : अकोला: अल्पवयीन मुलं ट्रिपल सीटने प्रवास करताना ट्रकने दिली धडक, तिघांचा दुर्दैवी मृत्यू, दोघे सख्खे भाऊ

'मुलाच्या डोळ्याची दृष्टी गेली'

काठीने केलेल्या मारहाणीमुळे डोळ्याला जबर मार लागला होता, यामुळे दुखापत देखील झाली होती. वडिलांचे म्हणणे आहे की, मुलाच्या एका डोळ्यात अजूनही पूर्णपणे दृष्टी आलेली नाही. शाळेच्या संचनालक आणि मुख्याध्यापकांनी मुलाचा वैद्यकीय खर्च भागवण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप कोणतीही मदत आलेली नाही. पीडितेनं केलेल्या तक्रारीवरून, शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शाळेच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp