T-20 World Cup: अक्षर पटेलने 'इथे' फिरवली मॅच, इंग्लंडच्या पराभवाचा 'हा' आहे टर्निंग पॉईंट!

मुंबई तक

Axar Patel catches: इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सेमीफायनलमध्ये भारताचा ऑलराउंडर अक्षर पटेल याने दोन जबरदस्त कॅच घेतला सामना भारताच्या बाजूने झुकवला आणि त्याच जोरावर टीम इंडियाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: टी-२० विश्वचषक २०२६च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवलेल्या या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 253 धावांचा डोंगर उभारला होता. ज्यात संजू सॅमसन आणि फलंदाजांच्या आक्रमक फलंदाजीचा वाटा मोठा होता. पण इंग्लंडच्या संघाने देखील टीम इंडियाला अत्यंत कडवी झुंज दिली. त्यामुळे भारताला इंग्लंडवर अवघ्या 7 धावांनीच विजय मिळवता आला. या सामन्यातील सर्वात चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे भारतीय ऑलराउंडर अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांनी घेतलेला विल जॅक्स कॅच. 

असा घेतला जॅक्सचा कॅच अन् टर्निंग पॉईंट

अक्षरने विल जॅक्सचा एक अप्रतिम रिले कॅच घेत संपूर्ण सामन्याची दिशाच बदलून टाकली. सुरुवातीला झटपट विकेट गेल्यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्स यांनी झटपट धावा करत चांगली भागीदारी केली. दोन्ही फलंदाज अत्यंत आक्रमक पद्धतीने खेळत होते. त्यामुळे सामना हा पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकला होता. अशावेळी या दोन्ही फलंदाजांपैकी एकाला बाद करणं गरजेचं होतं.  त्यामुळे 14 व्या ओव्हरसाठी कर्णधार सूर्यकुमारने अर्शदीप सिंहकडे बॉल सोपवला. सुरुवातीला अर्शदीपने स्वैर गोलंदाजी केली.

हे ही वाचा>> T-20 World Cup: टीम इंडियाचा नवा हिरो... सलग दोन Half Century ठोकणारा संजू सॅमसन आहे तरी कोण?

पण ओव्हरच्या शेवटचा चेंडू अर्शदीपने वाइड फुलटॉस टाकला. ज्यावर जॅक्सने डीप एक्स्ट्रा कव्हरकडे एक उंच फटका मारला. त्याच दिशेने अक्षर पटेल हा वेगाने धावत गेला आणि त्याने कॅच पकडला. पण आपण सीमारेषा ओलांडणार हे त्याला लक्षात आलं तेव्हा त्याने हातातील चेंडू शिवम दुबेकडे फेकला, जो दुबेने सहज झेलला. ज्यामुळे फॉर्मात असलेला जॅक्स बाद झाला. जॅक्सने अवघ्या 20 चेंडूत 35 धावा केल्या होत्या.  

याच कॅचमुळे सामन्याचा रोख पूर्णपणे बदलला. कारण बॅथल आणि जॅक्स हे मैदानात सेट झाले होते. मात्र, जॅक्सच्या विकेटनंतर सगळा भार हा बॅथलवर आला आणि इथेच सामना भारताच्या बाजूने झुकला.

हे वाचलं का?

    follow whatsapp