समलैंगिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढला, महिला प्रियकरासोबत कट रचला, 60 हजारांची सुपारी

मुंबई तक

UP Crime News : समलैंगिक नात्यात अडथळा ठरत असलेल्या पतीला संपवण्यासाठी पत्नीनेच आपल्या महिला प्रेयसीसोबत मिळून खुनाचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या हत्येसाठी 60 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मृत शेतकऱ्याची पत्नी, तिची महिला प्रेयसी आणि एका साथीदारास अटक केली असून दोन आरोपी सध्या फरार आहेत.

ADVERTISEMENT

UP Crime News
UP Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

समलैंगिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा काटा काढला

point

महिला प्रियकरासोबत कट रचला, 60 हजारांची सुपारी

UP Crime News : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.  समलैंगिक नात्यात अडथळा ठरत असलेल्या पतीला संपवण्यासाठी पत्नीनेच आपल्या महिला प्रेयसीसोबत मिळून खुनाचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या हत्येसाठी 60 हजार रुपयांची सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी मृत शेतकऱ्याची पत्नी, तिची महिला प्रेयसी आणि एका साथीदारास अटक केली असून दोन आरोपी सध्या फरार आहेत.

दीड वर्षांपासून होते समलैंगिक प्रेमसंबंध 

अधिकची माहिती अशी की, 14 जानेवारी रोजी असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीकर गावात शेतकरी सुमेर सिंह यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर आरोपींनी सुमेर सिंह यांचा मृतदेह अरहराच्या शेतात फेकून दिला होता. शेतात मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.  हे प्रकरण खुनाचे असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. फतेहपूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत कॉल डिटेल्स आणि स्थानिक चौकशीच्या आधारे प्रकरणाचा छडा लावला. तपासात उघड झाले की मृतक सुमेर सिंह यांची पत्नी रेनू देवी आणि मालती देवी नावाच्या महिलेचे गेल्या दीड वर्षांपासून समलैंगिक संबंध होते. हे नाते इतके घट्ट झाले होते की दोघींनाही एकत्र स्वतंत्र आयुष्य जगायचे होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, मालती देवीचे यापूर्वी तीन विवाह झाले होते. तरीही ती वारंवार सुमेर सिंह यांच्या घरी येत असे आणि बहुतांश वेळ रेनू देवीसोबतच घालवत होती. या संबंधांची माहिती सुमेर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी मालती देवीला घरी येण्यास आणि रेनूशी संपर्क ठेवण्यास कडक मनाई केली. यानंतर दोघींनी छुप्या मार्गाने संपर्क सुरू ठेवला. मालती देवीने रेनूला एक लहान कीपॅड मोबाईल फोन दिला होता. या मोबाईलवरून दोघींमध्ये तासन्‌तास संभाषण होत असे. याच संभाषणांदरम्यान सुमेर सिंह यांना कायमचा संपवण्याचा कट रचण्यात आला.

हेही वाचा : पुण्याहून मालेगावला निघालेल्या खासगी बसचा भीषण अपघात, 4 प्रवाशांचा मृत्यू; 22 जण जखमी

हे वाचलं का?

    follow whatsapp