पुण्याहून मालेगावला निघालेल्या खासगी बसचा भीषण अपघात, 4 प्रवाशांचा मृत्यू; 22 जण जखमी

मुंबई तक

Nashik Private Bus Accident : मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मालेगावकडे येणारी खासगी ट्रॅव्हल बस (क्रमांक MP 70 ZC 7799) आणि पिकअप (क्रमांक MH 12 JF 7422) यांची पहाटे महामार्गावर समोरासमोर धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की बस आणि पिकअप दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडकेनंतर बसमधील प्रवासी जोरात आदळल्याने बसमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी जागीच बेशुद्ध पडले, तर काहींना गंभीर दुखापती झाल्या.

ADVERTISEMENT

Nashik Private Bus Accident
Nashik Private Bus Accident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्याहून मालेगावला निघालेल्या खासगी बसचा भीषण अपघात

point

4 प्रवाशांचा मृत्यू; 22 जण जखमी

Nashik Private Bus Accident : पुण्याहून मालेगावकडे येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसचा नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला. मालेगाव–मनमाड महामार्गावर वा-हाणे गावाजवळ पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल बस आणि महिंद्रा पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून मालेगावकडे येणारी खासगी ट्रॅव्हल बस (क्रमांक MP 70 ZC 7799) आणि महिंद्रा पिकअप (क्रमांक MH 12 JF 7422) यांची पहाटे महामार्गावर समोरासमोर धडक झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की बस आणि पिकअप दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धडकेनंतर बसमधील प्रवासी जोरात आदळल्याने बसमध्ये एकच गोंधळ उडाला. काही प्रवासी जागीच बेशुद्ध पडले, तर काहींना गंभीर दुखापती झाल्या.

हेही वाचा : बीड : घोटाळेबाज कुटे दाम्पत्याला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनला दुचाकीस्वारांनी दिली धडक, अपघातात एकाचा दुर्देवी अंत

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बसमधून बाहेर काढले. त्यानंतर पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमी प्रवाशांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पहाटेची वेळ असल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत केली. या अपघातात मृत्युमुखी पडलेले चारही प्रवासी मालेगाव येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर बसमधील इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.  जखमी प्रवाशांना उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

हे वाचलं का?

    follow whatsapp