कारमध्ये तरुणीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, पीडितेनं भीतीने धावत्या कारमधून मारली उडी, जंगलात घालवली रात्र
Crime News : तरुणीने लैंगिक अत्याचाराच्या भीतीने धावत्या कारमधून उतरून जंगलाच्या दिशेने अनवाणी गेली. संबंधित प्रकरणात प्रतिकार केला असता, त्याने तिला मारहाण केली. तिने जंगलामध्ये एक रात्र काढली. ती एका महिलेकडे गेली असता, घटनेचा संपूर्ण प्रकार सांगितला. तिने सुमारे 8 तास संघर्ष केला होता. पीडित तरुणी ही नैनितालला जाताना ही दुर्दैवी घटना घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दीपकने जंगलाकडे गाडी वळवली
पीडितेनं जंगलात काढली रात्र
Crime News : तरुणीने लैंगिक अत्याचाराच्या भीतीने धावत्या कारमधून उतरून जंगलाच्या दिशेने अनवाणी गेली. संबंधित प्रकरणात प्रतिकार केला असता, त्याने तिला मारहाण केली. तिने जंगलामध्ये एक रात्र काढली. ती एका महिलेकडे गेली असता, घटनेचा संपूर्ण प्रकार सांगितला. तिने सुमारे 8 तास संघर्ष केला होता. पीडित तरुणी ही नैनितालला जाताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
हे ही वाचा : पुणे : दिवेघाट पायथ्याशी आढळला महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह, शारीरिक संबंधाला प्रतिकार केल्याने हत्या
पीडितेनं सांगितलं की, ती निसर्गप्रेमी असून ती शांत ठिकाणी प्रवास करते. म्हणूनच तिने नैनितालला जाण्याचा प्लान केला होता. तिला अशा होती की तिला निसर्गाच्या सानिध्यात जायचं होतं, परंतु वाटेत जे घडले त्या घटनेनं तिला हादरवून टाकले होते.
दीपकने जंगलाकडे गाडी वळवली
मुलीच्या म्हणण्यांनुसार, तिने गुरुवारी हल्दानी येथील रहिवासी दीपक बोरा यांच्याकडून टॅक्सी भाड्याने घेतली होती. नैनीतालच्या सुमारे 12 किमी आधी, दीपकने पटवाडनगर रस्त्यावरील जंगलाकडे गाडी वळवली. तिने विरोध केला असता, त्याने गाडीचा वेग वाढवला, त्यानंतर तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. संबंधित आरोपी हा दारू प्यायला होता.
पीडितेनं जंगलात काढली रात्र
दरम्यान दोघांमध्ये हाणामारी झाली होती. इतक्यात पीडित तरुणी कारमधून उतरली आणि अनवाणी पळून गेली होती. दीपकने मुलीचा पाठलाग केला, पंरतु तरुणी रस्त्याच्या खाली उतरून एका ठिकाणी लपली आणि तिने त्याच ठिकाणी एक रात्र काढली होती. तरुणीने सांगितले की, तिला ज्या टॅक्सी ड्रायव्हरवर विश्वास होता त्याचा काही वाईट हेतू नव्हता याची तिला कल्पना देखील नव्हती. तिच्या डोक्यात त्या नरमाधमांच्या तावडीतून सुटावे हेच डोक्यात होते.










