रेकॉर्डिंग डिलिट केल्याने मुलगा बनला हैवान, आईच्या तोंडात बनियनचा बोळा करुन कोंबला अन्...बदलापूरात धक्कादायक घटना

मिथिलेश गुप्ता

Badlapur Crime News : देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली असं म्हटलं जातं. मात्र याच आईचा जीव घेण्याचा प्रयत्न एका मुलाने केला आहे.  बदलापूर (पूर्व) येथील एका मुलानेच आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलमधील रेकॉर्डिंग डिलिट झाल्याच्या वादात मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.

ADVERTISEMENT

Badlapur Crime News
Badlapur Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

रेकॉर्डिंग डिलिट केले म्हणून मुलगा बनला हैवान

point

आईच्या तोंडात बनियनचा बोळा करुन कोंबला अन्...

point

बदलापूरात धक्कादायक घटना

Badlapur Crime News : देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली असं म्हटलं जातं. मात्र याच आईचा जीव घेण्याचा प्रयत्न एका मुलाने केला आहे.  बदलापूर (पूर्व) येथील एका मुलानेच आपल्या आईवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलमधील रेकॉर्डिंग डिलिट झाल्याच्या वादात मुलाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.  या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार झालेल्या आरोपीला अखेर उल्हासनगर गुन्हे शाखेने अटक केली आहे.

हे ही वाचा : पुणे : दिवेघाट पायथ्याशी आढळला महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह, शारीरिक संबंधाला प्रतिकार केल्याने हत्या

रेकॉर्डिंग डिलिट केल्याने वाद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नंदा नारायण व्यापारी या आनंदनगर, गावदेवी येथील गोकुळ सोसायटी बी विंग, रूम क्रमांक 201 येथे राहतात. तीन दिवसांपूर्वी रात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास कुळगाव बदलापूर पूर्व येथील सौजन्य अपार्टमेंटमधील रूम क्रमांक 105 मध्ये ही घटना घडली. त्या वेळी फिर्यादी आणि त्यांचा नातू हॉलमध्ये झोपलेले असताना त्यांचा मुलगा मिलिंद नारायण व्यापारी (वय 36) त्यांच्या जवळ आला. त्याच्या पत्नीबरोबर झालेल्या संभाषणाचे मोबाईलमधील रेकॉर्डिंग कोणी डिलीट केले, या कारणावरून त्याने आईला झोपेतून उठवून वाद घातला. 

बनियानचा बोळा तोंडात कोंबला अन्...

या वादादरम्यान त्याने आईला शिवीगाळ करत त्यांच्या तोंडावर हाताने चापट्या मारल्या. यानंतर आरोपीने आईला बेडवर ढकलून कपाटातील बनियनचा बोळा करून त्यांच्या तोंडात कोंबला आणि एका हाताने त्यांचा गळा आवळत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी मिलिंद व्यापारी फरार झाला होता.

हे वाचलं का?

    follow whatsapp