8 वर्षांपासून अनेक प्रयत्न केले, तरीही मुल होईना, संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला, अन् स्वत:ही केली आत्महत्या

मुंबई तक

Crime News : मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नगर (सिविल लाइन्स) येथील रहिवासी असलेला विनोद आणि त्याची पत्नी दुपारी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, वाटेतच काशीराम कॉलनीजवळील निर्जनस्थळी विनोदने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची गळा चिरून हत्या केली. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

8 वर्षांपासून अनेक प्रयत्न केले, तरीही मुल होईना

point

संतापलेल्या पतीने पत्नीचा गळा चिरला, अन् स्वत:ही केली आत्महत्या

Crime News : अनेक प्रयत्न करुनही मुलं होत नसल्याने संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवरही चाकूने वार करून आपले जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील मझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत होळीच्या सणादिवशी ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. काशीराम कॉलनी परिसरातील जंगलात एका हा प्रकार घडलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन नगर (सिविल लाइन्स) येथील रहिवासी असलेला विनोद आणि त्याची पत्नी दुपारी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, वाटेतच काशीराम कॉलनीजवळील निर्जनस्थळी विनोदने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची गळा चिरून हत्या केली. पत्नीचा मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून घेतले. काही वेळाने एका व्यक्तीने विनोदला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी विनोदला रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विनोद जिथे सापडला होता, त्यापासून अवघ्या 15 मीटर अंतरावर त्याच्या पत्नीचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा : पुणे : शाळेत टिळा लावून येण्यास मनाई, मुख्याध्यापकावर खळबळजनक आरोप; हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते आक्रमक

या धक्कादायक घटनेमागे कौटुंबिक वादाचे कारण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मृत महिलेच्या मावशीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाला आठ वर्षे होऊनही मूल होत नसल्याने विनोद पत्नीला वारंवार मारहाण करत असे. त्याला दुसरे लग्न करायचे होते आणि त्यासाठी तो बिहारलाही जाऊन आला होता. दुसरीकडे, विनोदच्या भावाने मात्र घरात कोणताही वाद नसल्याचा दावा केला आहे. ते दोघे मूल दत्तक घेण्याच्या विचारात होते आणि त्यांच्यात सर्व काही सामान्य होते, असे त्याने पोलिसांना सांगितले.

हे वाचलं का?

    follow whatsapp