BMC च्या इतिहासात पहिल्यांदाचं घडलं असं, 'या' वॉर्डात 'NOTA' ला सर्वाधिक मतं.. इथे कोण होणार नगरसेवक?

मुंबई तक

Mumbai Mahanagar Palika Election 2026 :  या वॉर्डमध्ये तब्बल 15 उमेदवार निवडणूक रिंगणात असतानाही मतदारांनी कोणालाही पसंती न देता ‘नोटा’ (None of the Above) या पर्यायाला कौल दिला आहे. या वॉर्डमधून विविध प्रमुख पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार देखील निवडणूक लढवत होते.

ADVERTISEMENT

Mumbai Mahanagar Palika Election 2026
Mumbai Mahanagar Palika Election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाचं असं घडलं

point

वॉर्ड क्रमांक 119 च्या निकालाने खळबळ; सर्वपक्षीयांना घामटा फुटला

Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 119 मधून एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वच राजकीय पक्षांना धक्का देणारा निकाल समोर आलाय.  या वॉर्डमध्ये तब्बल 15 उमेदवार निवडणूक रिंगणात असतानाही मतदारांनी कोणालाही पसंती न देता ‘नोटा’ (None of the Above) या पर्यायाला कौल दिला आहे. या वॉर्डमधून विविध प्रमुख पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार देखील निवडणूक लढवत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शिवसेना, समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, अखिल भारतीय सेना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी तसेच अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात होते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार असतानाही मतदारांचा विश्वास कोणावरही बसला नाही.

मतदानाच्या दिवशी उत्साह दिसून आला असला, तरी निकालाने राजकीय पक्षांना स्पष्ट संदेश दिला आहे. राजकीय पक्षांनी दिलेले उमेदवार आम्हाला पसंत नसल्याचे सर्वा जनतेने मतदानातून दाखवून दिले. मात्र, NOTA नंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेला, म्हणजे NOTA वगळता सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार नगरसेवक होतो. मात्र, मतदारांनी त्यांचा हक्क व्यवस्थितरित्या बजावलेला पाहायला मिळाला.

हेही वाचा : BMC Ward-wise Results LIVE: पाहा तुमच्या वॉर्डमध्ये कोण आलं निवडून, मुंबई महापालिकेतील वॉडनुसार निकाल!

राजकीय विश्लेषकांच्या मते, नोटाला मिळालेली पसंती ही सध्याच्या राजकीय परिस्थितीतील असमाधान, स्थानिक पातळीवर काम न झाल्याची भावना आणि उमेदवारांविषयीची नाराजी दर्शवते. विशेषतः महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाहतूक यासारख्या मुद्द्यांवर ठोस भूमिका अपेक्षित असते. ती अपेक्षा पूर्ण न झाल्याने मतदारांनी हा पर्याय निवडल्याचे बोलले जात आहे. या निकालामुळे सर्वच राजकीय पक्षांसमोर आत्मपरीक्षणाची वेळ आलीये. आगामी निवडणुकांमध्ये उमेदवार निवड, जनसंपर्क आणि प्रत्यक्ष कामावर भर देणे आवश्यक असल्याचा स्पष्ट संदेश वॉर्ड क्रमांक 119 मधील मतदारांनी दिला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp