मेट्रोत 16 वर्षाच्या मुलाने फॉरेनर महिलेला केला चुकीचा स्पर्श, म्हणाली, 'मी इथून पुढं तुमच्या देशात...' लाज आणणारा प्रकार
Viral News : दिल्ली मेट्रोत अमेरिकन महिलेसोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित महिलेनं दावा केला की, दिल्ली मेट्रो स्टेशनवर एका 16 वर्षीय मुलाने तिचा विनयभंग केला. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर, मुलाच्या आई आणि बहिणीने परदेशी महिलेला फटकारले आणि मुलाचा बचाव केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
14-16 वर्षांचा मुलाने पीडितेला केला चुकीचा स्पर्श
मेट्रोत घडलं भयंकर कांड
Viral News : दिल्ली मेट्रोत अमेरिकन महिलेसोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित महिलेनं दावा केला की, दिल्ली मेट्रो स्टेशनवर एका 16 वर्षीय मुलाने तिचा विनयभंग केला. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या घटनेनंतर, मुलाच्या आई आणि बहिणीने परदेशी महिलेला फटकारले आणि मुलाचा बचाव केला. या घटनेनं परिसर हादरून गेल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : मुंबईच्या महापौरपदासाठी भाजप अन् ठाकरे गटात बोलणी सुरु असल्याची चर्चा, नेमकं काय घडतंय? सुषमा अंधारेंनी सांगितलं
परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर
या घटनेनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे, महिलांच्या, विशेषत: परदेशी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. न्यू जर्सी येथील स्टीव्हन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण देणारे भारतीय-अमेरिकन प्राध्यापक गौरव सबनीस यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यांच्याच एका विद्यार्थ्याने पीडितेला भारतात प्रवास करण्याबाबत सल्ला दिला होता. एका मित्राच्या लग्नासाठी फॉरेनर दिल्लीत आली होती. प्राध्यापक सबनीस यांनी तिला दिल्लीत, विशेषत: फॉरेनर महिलांच्या असुरक्षिततेबाबत सांगितलं होतं. ते फॉरेनर असल्याने तुला टार्गेट केलं जाईल, नंतर हे खरं ठरलं.
14-16 वर्षांचा मुलाने पीडितेला केला चुकीचा स्पर्श
पीडितेनं सबनीस यांना पाठवलेल्या एका मेसेजमध्ये संपूर्ण घटनेचं वर्णन केलं. महिलेनं दिलेल्या माहितीनुसार, 14-16 वर्षांचा मुलगा हा त्याच्या आई आणि बहिणीसोबत मेट्रो स्थानकावर होता. त्याने महिलेला फोटो काढण्यास सांगितला होता. महिलेला वाटले की, ती एका कुटुंबासोबत असल्याने तिच्यासोबत कसलाही चुकीचा प्रकार घडणार नाही, पण त्या मुलाने फोटो काढताना तिच्या खांद्यावर हात ठेवत, नंतर अचानक तिचे गुप्तांग दाबत तिच्या नितंबावर थाप मारली. नंतर तो तिच्याकडे बघून हसू लागला आणि त्याने या कृत्याला अगदी खेळीमेळीत घेतलं.
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता, काय सांगतं राशीभविष्य?
'मला तुमचा देश खूप आवडायचा, पण इथून पुढे...'
संतापलेल्या पीडितेनं मुलाची कॉलर पकडून ढकललं. त्यानंतर मुलाच्या आई आणि बहिणीने पीडितेवरच आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती. आईने दावा केला की, 'तिच्या मुलाने कधीही परदेशी महिलेला जवळून पाहिले नव्हते आणि त्यामुळे त्याची दिशाभूल करण्यात आली', असं म्हणत पाठीशी घातले. त्या पीडितेनं यावर वक्तव्य केलं की, 'मला तुमचा देश खूप आवडायचा, पण इथून पुढे मी पुन्हा परतणार नाही. खरं तर, मी संपूर्ण दक्षिण आशियेत येणं टाळेन', या घटनेनं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.










