मतदान केंद्रावर लोकांची गर्दी असतानाच क्रोबा दिसला अन् खळबळ उडाली, नवी मुंबईत काय घडलं? पाहा VIDEO

मुंबई तक

A cobra snake was spotted at the polling station Navi Mumbai Mahanagar Palika Election 2026 : घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेतली. मतदारांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली आणि परिसर रिकामा करून सुरक्षित अंतर राखण्यात आले. त्यानंतर सर्पमित्रांना तातडीने पाचारण करण्यात आले.

ADVERTISEMENT

Navi Mumbai Mahanagar Palika Election
Navi Mumbai Mahanagar Palika Election
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मतदान केंद्रावर लोकांची गर्दी असतानाच क्रोबा दिसला अन् खळबळ उडाली

point

नवी मुंबईत काय घडलं? पाहा VIDEO

A cobra snake was spotted at the polling station Navi Mumbai Mahanagar Palika Election 2026 : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीदरम्यान शिरवणे परिसरातील एका मतदान केंद्रात अचानक कोब्रा साप आढळल्याने खळबळ उडाली. शिरवणे येथील लक्ष्मीबाई सुतार प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या मतदान केंद्र क्रमांक 21/1 मध्ये ही घटना घडली. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांची गर्दी जमलेली असताना अचानक साप दिसल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रत्यक्षदर्शींनुसार, मतदान केंद्राच्या आवारात लोक रांगेत उभे असताना एका कोपऱ्यात हालचाल दिसून आली. सुरुवातीला नेमके काय आहे हे कुणाच्या लक्षात आले नाही. मात्र क्षणातच तो कोब्रा (नाग) असल्याचे स्पष्ट झाले. हे लक्षात येताच मतदारांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही नागरिकांनी घाबरून मागे हटणे पसंत केले, तर काहींनी इतरांना सावध करत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेतली. मतदारांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असल्याने सर्वांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले. मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली आणि परिसर रिकामा करून सुरक्षित अंतर राखण्यात आले. त्यानंतर सर्पमित्रांना तातडीने पाचारण करण्यात आले.

हे वाचलं का?

    follow whatsapp