राज्य निवडणूक आयोगाची मार्करवरून पहिली प्रतिक्रिया म्हणाले, 'मार्करची शाई जाणं हा फेक नरेटीव्ह'

मुंबई तक

Election Commission : राज्यात महापालिका निवडणुकीत आज 15 जानेवारी रोजी मतदार मतदानाचा अधिकार बजावत आहेत. मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटावरील मार्कर पेनने केलेलं मार्किंग पुसत असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती वृत्तमाध्यमाद्वारे समोर येऊ लागली आहे. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. 

ADVERTISEMENT

Election Commission
Election Commission
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काय म्हणाले राज्य निवडणूक आयोग? 

point

शाईचं नेमकं प्रकरण काय? 

Election Commission : राज्यात महापालिका निवडणुकीत आज 15 जानेवारी रोजी मतदार मतदानाचा अधिकार बजावत आहेत. मतदारांनी मतदान केल्यानंतर त्यांच्या बोटावरील मार्कर पेनने केलेलं मार्किंग पुसत असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती वृत्तमाध्यमाद्वारे समोर येऊ लागली आहे. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे. 

हे ही वाचा : मार्कर पेनवरून उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांबाबत केली 'ती' मागणी म्हणाले, 'निवडणूक आयुक्तांना...'

काय म्हणाले राज्य निवडणूक आयोग? 

राज्य निवडणूक आयोग म्हणाले की, मार्करची शाई जाणं हा एक फेक नरेटीव्ह आहे. या मार्कर पेनचा वापर 2011 पासून करण्यात आला आहे. ही शाई पुसली जात नाही, शाई लावल्यानंतर 12 ते 15 सेकंद ती ट्राय केली जाते. शाईचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यामुळे या मतदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

तसेच त्यांनी दुबार मतदारांबाबतही सांगितलं की, मतदार हा मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात येतो. तेव्हा त्याची तपासणी केली जाते. जर मतदाराने दुबार मतदान केल्याचा मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना आढळल्यास त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता, असं निवडणूक अधिकारी म्हणाले. 

हे ही वाचा : मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निवडणूक आयोगाने..'

शाईचं नेमकं प्रकरण काय? 

महापालिका निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, मतदारांच्या बोटाला शाईऐवजी मार्कर लावलं जात आहे. याचेच अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे आता मतदार मार्करच्या शाईवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp