मार्कर पेनवरून उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयुक्तांबाबत केली 'ती' मागणी म्हणाले, 'निवडणूक आयुक्तांना...'
Uddhav Thackeray marker pen incident: राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानाचा 15 जानेवारी रोजी दिवस आहे. याच निवडणुकीत शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला झापलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'निवडणूक आयुक्तांकडून रडीचा डाव'
'निवडणूक आयुक्तांना निलंबित करून, कारवाई करावी'
उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली टीका
Uddhav Thackeray Marker Ink incident राज्यात महापालिका निवडणुकीच्या मतदानाचा 15 जानेवारी रोजी दिवस आहे. या महापालिका निवडणुकीत चर्चेत राहिलेली आणि केवळ राज्याचंच नाहीतर देशाचं लक्ष राहिलेली महापालिका म्हणून मुंबई महापालिकेकडं पाहिलं जात आहे. याच निवडणुकीत शाईऐवजी मार्कर पेनचा वापर केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. याचपार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला झापलं आहे.
हे ही वाचा : शाईऐवजी मार्करचा वापर, दुबार मतदार आणि पाडू मशीन, राज ठाकरे यांनी सगळंच काढलं
'निवडणूक आयुक्तांकडून रडीचा डाव'
उद्धव ठाकरे यांनी बोटाला मार्कर लावून तो पुसला जात असल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांना दाखवला होता. त्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाला देखील झापलं आहे. यामुळे निवडणूक आयुक्त हे रडीचा डाव खेळत आहे, असं समजतंय. त्यांनी निवडणूक आयोगाला घरगडी म्हणून ठेवलं का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निवडणूक आयोगाने..'
'निवडणूक आयुक्तांना निलंबित करून, कारवाई करावी'
त्यांनी सर्व प्रकार करून पाहिले, पैसे देखील वाटले आणि ते उघडकीस आलं. सोशल मिडिया, टीव्ही चॅनेल्समधून अनेक व्हिडिओ समोर आले होते. मी आणि राज ठाण्याला गेलो होतो, तेव्हा कोटी रूपयांची ऑफर उमेदवारांना देण्यात आली होती. अशा गोष्टींमुळे निवडणूक आयुक्तांना निलंबित करावं, त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. ते बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत. सत्ताधाऱ्यांची लाचारी करत आहेत, असं म्हणत त्यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला झापलं आहे.










