शाईऐवजी मार्करचा वापर, दुबार मतदार आणि पाडू मशीन, राज ठाकरे यांनी सगळंच काढलं
Raj Thackeray : आज 15 जानेवारी रोजी राज्यातील एकूण महापालिकेच्या मतदानाचा दिवस आहे. पण, याच मतदानाच्या दिवशी मतदारांच्या बोटाला शाईऐवजी मार्कर पेन लावलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे. नंतर तेच मार्कर पेन पुसलं देखील जात असल्याचं चित्र आहे. याचवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शाईऐवजी मार्करचा वापर
एक दिवसआधी घरोघरी जाऊन प्रचार
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतून हल्लाबोल
Raj Thackeray : महापालिका निवडणुकीच्या आज 15 जानेवारी रोजी मतदार बांधव मतदानाचा अधिकार बजावताना दिसत आहेत. याचपार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत, सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी बोलताना शाईऐवजी मार्करचा वापर करण्यात येत असल्याचं सांगितलं. यामुळे लोकशाही फार काळ टीकेल असं वाटत नाही, असं म्हणत त्यांनी सध्या सुरु असलेल्या महापालिका निवडणुकीवर भाष्य केलं.
हे ही वाचा : मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निवडणूक आयोगाने..'
शाईऐवजी मार्करचा वापर
राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सरकारवर टीका केली आहे. निवडणूक आयोगाला शाईऐवजी मार्करचा वापर करण्यात येत असून यावरून पत्र लिहिलं तरी निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नसल्याचं ते म्हणाले होते. दुबार मतदार भेटत आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अशातच पाडू नावाची मशीन आली आहे, त्या मशीनची कोणत्याही राजकीय नेत्याला माहिती देण्यात आली नव्हती.
एक दिवसआधी घरोघरी जाऊन प्रचार
त्यानंतर ते पुढे म्हणाले की, निवडणुकीच्या एक दिवसआधी प्रचार थांबला असताना घरोघरी जाऊन प्रचारासाठी एक दिवस वाढवण्यात आला, हे सर्व ठरवून केलं जात आहे. यामुळे लोकशाही फार काळ टीकेल असं वाटत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : मतदानासाठी वापरलेली शाई पुसली जातेय, 'मुंबई Tak'चा फॅक्ट चेक; निवडणूक आयोगाने याबाबत काय म्हटलं होतं? VIDEO
नंतर पुढे ते म्हणाले की, जे विधानसभेला केलं, तेच आता प्रकरण सुरु आहे, पण ते आम्ही होऊ देणार नाही. आता पाडू मशीनचा वापर करण्यात आला, त्यांनी पत्रकारांनाही या प्रक्रियेवर लक्ष ठेवावं असं अवाहन केलं आहे.









