मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निवडणूक आयोगाने..'

मुंबई तक

Devendra Fadnavis on Election Commission : विशेषतः नखावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis on Election Commission
Devendra Fadnavis on Election Commission
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी

point

देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निवडणूक आयोगाने..'

Devendra Fadnavis on Election Commission :  मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी राज्यातील विविध भागांतून समोर येत आहेत. काही मतदारांनी बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याचा दावा केल्याने या मुद्द्यावर चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात ‘मुंबई Tak’ने फॅक्ट चेक केला असता, काही ठिकाणी शाई पुसली जात असल्याची बाब समोर आली आहे. विशेषतः नखावर लावलेली शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले? 

मतदान करून बाहेर पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “या बाबी निवडणूक आयोग ठरवतो. यापूर्वीही अनेक निवडणुकांमध्ये मार्कर पेनचा वापर करण्यात आला आहे. कोणाची तक्रार असेल तर निवडणूक आयोगाने त्याकडे लक्ष द्यावे. मात्र, काही लोक उद्याचा निकाल लागल्यानंतर काय उत्तर द्यायचं, याची तयारी करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.”

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाही अधिक मजबूत करायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान झाले पाहिजे. मतदान हा केवळ अधिकार नसून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान न करणे म्हणजे कुठेतरी आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्यासारखे आहे. मी मतदान केले आहे, सर्व नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.

चांगले मतदान झाले तर चांगले प्रतिनिधी निवडून येतात आणि त्यातूनच विकास साधला जातो. उत्तम शहरे घडवायची असतील तर 29 महानगरपालिकांमधील नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

हे वाचलं का?

    follow whatsapp