संजय राऊतांना नडणाऱ्या नवनाथ बन यांच्या निवडणुकीचा निकाल आला समोर, मानखुर्दमध्ये नेमकं काय घडलं?
Navnath Ban win Election : नवनाथ बन यांनी पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी स्वीकारली होती. जेव्हा भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली, तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मानखुर्द हा मुस्लिमबहुल परिसर असल्याने ही जागा भाजपसाठी आव्हानात्मक मानली जात होती. मात्र, मतमोजणीनंतर सुरुवातीपासूनच नवनाथ बन यांनी आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय देखील मिळवला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
संजय राऊतांना नडणाऱ्या नवनाथ बन यांच्या निवडणुकीचा निकाल आला समोर
मानखुर्दमध्ये नेमकं काय घडलं?
Navnath Ban win Election : मुंबई महानगरपालिका (बीएमसी) निवडणुकीचे निकाल हाती येत असून महायुती सत्तेच्या वाटेने आगेकुच करत आहे. दरम्यान, भाजपचे राज्य माध्यम प्रमुख आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुंबईतील मानखुर्द परिसरातील वॉर्ड क्रमांक 135 मधून प्रथमच निवडणूक लढवत दणदणीत विजय मिळवला आहे. पत्रकार ते राजकीय नेते असा प्रवास करत त्यांनी या मतदारसंघातून भाजपचा झेंडा फडकावला आहे.
नवनाथ बन यांनी पहिल्यांदाच महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी स्वीकारली होती. जेव्हा भाजपने त्यांची उमेदवारी जाहीर केली, तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मानखुर्द हा मुस्लिमबहुल परिसर असल्याने ही जागा भाजपसाठी आव्हानात्मक मानली जात होती. मात्र, मतमोजणीनंतर सुरुवातीपासूनच नवनाथ बन यांनी आघाडी घेतली आणि अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय देखील मिळवला.
मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेरीत नवनाथ बन यांना 1,714 मतांसह 506 मतांनी आघाडी मिळाली होती. नंतरच्या फेरीत ही आघाडी वाढत गेली. अखेर त्यांचा 80000 मतांनी विजय झाल्याची माहिती समोर आलीये. या विजयानंतर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांनी विजयानंतर जल्लोष साजरा केला.
हेही वाचा : BMC Election Results 2026: मुंबईतील प्रत्येक वॉर्डचा नेमका निकाल, पाहा आता तुमचा नवा नगरसेवक कोण










